बॉलिवूडची झगमगाटाची दुनिया ही पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या जगताकडे तरुणाई आकर्षित होत असते. परंतु सिने जगतात स्टार होण्यापर्यंतचा प्रवास काही वाटतो तितका सोपा नसतो. त्यामुळेच हिंदी सिने जगतातील अनेक कलाकारांना मोठ संघर्ष करुन या जगतात यश मिळाले आहे. असेच संघर्षातून हिट झालेले अभिनेते म्हणजे राजेंद्र कुमार. ( २० जुलै) हा अभिनेते राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांचा जन्मदिवस. सिने जगतात यशस्वी होण्यासाठी स्वःचे राहते घर विकणारे एक संघर्षमय अभिनेते म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. जाणून घेऊ या त्यांच्या सिने जगताबद्दल.
आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिने जगतातचे सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र प्रसाद यांचा जन्म २० जुलै १९२९ मध्ये सियालकोट पाकिस्तानमध्ये झाला. सुमारे ४ दशके हिंदी सिने जगतावर त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. राजेंद्र कुमार यांनी एचएस रवैल यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांना हे कामही मिळाले ते त्यांचे मित्र गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्यामुळे. राजेंद्रला 150 रुपये पगारावर नोकरी मिळाली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
साल 1950 मध्ये त्यांना दिलीप कुमार यांच्यासोबत ‘जोगन’ चित्रपटात पडद्यावर दिसण्याची संधी मिळाली. पहिला चित्रपट राजेंद्र कुमार यांच्यासाठी खास ठरला नाही. जवळपास सात वर्षे आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केल्यानंतर अखेरीस १९५७ मध्ये आलेल्या ‘मदर इंडिया’ चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. राजेंद्र कुमार यांनी छोट्याशा भूमिकेत जीव ओवाळून टाकला आणि १९५९ मध्ये ‘गूंज उठी शहनाई’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
हा चित्रपट केल्यानंतर या दिग्गज अभिनेत्याला मागे वळून पाहावे लागले नाही. ‘धूल का फूल’, ‘मेरे मेहबूब’, ‘मैं मिलन की बेला’, ‘संगम’, ‘आरजू’ यांसारख्या चित्रपटांच्या जबरदस्त यशामुळे त्यांना ज्युबली कुमार या नावाने ओळखले जाऊ लागले. असे म्हटले जाते की राजेंद्र कुमार यांच्या चित्रपटांची लोकप्रियता इतकी होती की 25 आठवडे चित्रपटगृहांमध्ये चालायचा.
राजेंद्र कुमार यांनी कठोर परिश्रम करून पैसे कमावले, नंतर वांद्रे येथे समुद्राजवळ एक आलिशान बंगला विकत घेतला. हा बंगला राजेंद्र यांनी अभिनेता भारत भूषण यांच्याकडून खरेदी केला होता. त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून या बंगल्याचे नाव ‘डिंपल’ ठेवले आहे. हा बांगला त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरला आणि त्यांच्याकडे चित्रपटांची जणू रांगच लागली. पण एक वेळ अशी आली की त्याचे स्टारडम कमी होऊ लागले. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडली तेव्हा त्यांनी आपला बंगला त्या काळातील उगवता तारा राजेश खन्ना यांना विकला, ज्याचे नाव राजेश यांनी ‘आशीर्वाद’ ठेवले. या बंगल्यात आल्यानंतर राजेश खन्ना यांनी स्टारडम मिळवले आणि त्यांना सुपरस्टार ही पदवी मिळाली.
हेही वाचा –
फराहची थट्टा उडवणे करण जोहरला भोवले, निर्मातीने व्हिडिओ शेअर करत काढली खरडपट्टी
प्रेग्नंट आहे की नाही? खरं काय ते ‘बेबो’ने एकदाचं सांगूनच टाकलं; म्हणाली, ‘उफ्फ! मी प्रेग्नंट…’