Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! वाचा काय म्हणालाय अभिनेता

रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! वाचा काय म्हणालाय अभिनेता

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो पुन्हा ब्रेक घेण्यासाठी सज्ज झाला आहे! मात्र, चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही. यावेळी रणबीर जास्त ब्रेक घेणार नसून, तो फक्त एक आठवड्याची सुट्टी घेणार आहे. विशेष म्हणजे, या सुट्यांमध्ये तो पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) हनीमूनला जाणार आहे.

आलिया-रणबीरचे लग्न याच वर्षी एप्रिलमध्ये झाले होते. लवकरच त्यांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन होणार आहे. लग्नानंतर हे दोन्ही स्टार्स आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये इतके व्यस्त झाले होते, की ते अद्याप हनीमूनलाही जाऊ शकलेले नाहीत. मात्र, आता ते लवकरच ब्रेक घेण्याची तयारी करत आहेत. नुकतेच रणबीरने याबाबत चर्चा केली आहे. (ranbir kapoor is planning to go on a week long honeymoon)

नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान जेव्हा रणबीर कपूरला त्याच्या हनीमूनबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, तो आणि आलिया लवकरच ट्रिपला जाणार आहेत. तो म्हणाला, “‘शमशेरा’ रिलीझ झाल्यानंतर मी आणि आलिया सुट्टीवर जाण्याचा विचार करत आहोत.” त्याच वेळी रणबीर कपूरने असेही सांगितले की, जेव्हा त्याने आणि आलियाने अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांनाही माहित होते की त्यांच्यात काही कामाच्या कमिटमेंट आहेत. त्यामुळे आता ते त्याच्यापासून मागे हटू शकत नाहीत.

रणबीर कपूरचा चित्रपट ‘शमशेरा’ २२ जुलै २०२२ रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीर कोणतीही कसर सोडत नाहीये. या चित्रपटात रणबीरशिवाय संजय दत्त (Sanjaj Dutt) आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) देखील दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा