Thursday, January 29, 2026
Home कॅलेंडर दुःखद निधन! पुरस्कार नाकारणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड

दुःखद निधन! पुरस्कार नाकारणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड

साहित्य क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (Nanda Khare Pased Away) यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले आहे. पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून नंदा खरे हे आजारी होते. खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ( Nanda Khare Pased Away In Pune )

नंदा खरे याच नावाने अनंत खरे साहित्य लेखन करायचे. त्यांची ‘अंताजींची बखर’ ही कांदबरी खूप गाजली होती. ‘उद्या’ नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिले, असे म्हणत त्यांनी तो पुरस्कार नाकारला होता. नुकतीच त्यांची ‘नांगलल्यावीन भूई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती.

nanda khare

नंदा खरे यांचे साहित्य : वीसळे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानव प्राण्यांची,अंताजीची बखर इ. ( Nanda Khare Pased Away In Pune at Age 76 )

अधिक वाचा –
‘अलविदा’ I अदनान सामीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी
रणवीरच्या ‘त्या’ फोटोंवर अखेर पुनम पांडे बोललीच, म्हणाली ‘तू तर मलाच…’

हे देखील वाचा