‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता दिपेश भानच्या मृत्यूने संपूर्ण सिने जगतावर शोककळा पसरली आहे. अभिनेता दिपेश भान शुक्रवारी ( २२ जुलै) रोजी क्रिकेट खेळताना पडला होता. त्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या बातमीने मालिकेतील कलाकारांसह सिने जगताला मोठा धक्का बसला होता. एका तरुण आणि प्रतिभावान कलाकाराने घेतलेली ही एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून जाणारी ठरली. परंतु सिने जगतात याआधीही अनेक कलाकारांनी मनाला चटका लावणारी एक्झिट घेतली होती. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.
घनश्याम नायक – तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचाही असाच त्यांची मालिका गाजत असतानाच मृत्यू झाला होता. अनेक दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत असतानाच त्यांनी घेतलेली ही एक्झिट प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारी ठरली.
कवी कुमार आझाद – तारक मेहता का उल्टा चश्मा याच मालिकेतील लोकप्रिय कलाकार डॉ. हाथीच्या भूमिकेतील कलाकार कवि कुमार आजाद यांचा ९ जुलै २०१८ रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. अत्यंत संघर्ष करुन अभिनय जगतात आपली छाप पाडणाऱ्या या कलाकाराच्या अवेळी जाण्याने संपूर्ण सिने जगताला मोठा धक्का बसला होता.
सुरेखा सीकरी – अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे वयाच्या १६ जुलै २०२१ला निधन झाले होते. लोकप्रिय हिंदी मालिका बालिका वधू मधून त्यांनी घराघरात लोकप्रियता मिळवली होती. २०१८ मध्ये शूटिंग दरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यानंतर त्यांची अवस्था दिवसेंदिवस ढासळत गेली आणि यातच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
सिद्धार्थ शुक्ला – सिने जगतातील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्लाचाही अशाच प्रकारे धक्कादायक मृत्यू झाला होता. बालिका वधू मालिकेत आनंदीचा पती शिवची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थचा २ सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ४० व्या वर्षी मृत्यू झाला होता. या मालिकेने सिद्धार्थ शुक्लाला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.
हेही वाचा – ‘तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला’, रणवीर सिंगच्या न्यूड फोटोवर शर्लिन चोप्राची प्रतिक्रियापरिस्थिती खूप वाईट! ‘या’ कारणासाठी मिथुन चक्रवर्ती करणार होते आत्महत्याकधी खाल्ले विष, तर कधी पोलिसांसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल, सपना चौधरीचा वादाशी आहे जुना संबंध