Friday, March 29, 2024

परिस्थिती खूप वाईट! ‘या’ कारणासाठी मिथुन चक्रवर्ती करणार होते आत्महत्या

हिंदी सिने जगतात असे अनेक अभिनेते  आहेत जे सध्या सिने जगतात फारसे दिसत नसले तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असतात. अभिनेते मिथुन चक्रवर्ती (mithun chakraborty) यांच्याही नावाची सिने जगतातील लोकप्रिय कलाकार म्हणून नेहमीच चर्चा होत असते. सध्या ते चित्रपट जगतापासून दुर असले तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असतात. जे त्यांच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतात. अलिकडेच त्यांनी आपल्या सिनेजगतातील प्रवासाबद्दल बोलताना कधीकाळी त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता असा खुलासा केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

मिथुन चक्रवर्ती ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ८०-९० च्या दशकातील सुपरस्टार म्हणून मिथुन चक्रवर्ती यांचे नाव घेतले जाते. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. परंतु प्रत्येक कलाकाराप्रमाणे त्यांच्याही वाट्याला मोठा संघर्ष आला. या संघर्षाच्या काळात त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता असा  धक्कादायक खुलासा मिथुन चक्रवर्ती यांनी केला होता.

अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना मिथुनदा म्हणाले की, मी त्या आठवणी जास्त कोणाला सांगत नाही, किंवा त्याबद्दल कोणाशी चर्चाही करत नाही. कारण अशा गोष्टी आणि प्रसंग कलाकारांना नकारात्मकतेकडे घेऊन जात असतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात संघर्ष केलेला असेल पण माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी मोठ्या होत्या. त्यामुळेच कधी कधी वाटायचे की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. याच कारणाने अनेकदा आत्महत्या करण्याचाही विचार माझ्या मनात आला होता. परंतु कोणत्याही कलाकाराने आत्महत्या करण्याचाही विचार कधीही मनात आणू नये. मी सुद्धा माझ्या आयुष्यात संकटांशी सामना केला. त्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो.

दरम्यान, अभिनेते मिथुन दा अलिकडेच काश्मिर फाईल्स या चित्रपटात झळकले होते. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रमाणेच अभिनेते अनुपम खेर यांनीही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

हे देखील वाचा