बॉलिवूडमध्ये तिन्ही खानांचा दबदबा आजही कायम आहे. या सुपरस्टार्सना एकाच फ्रेममध्ये पाहणे खूप मोठी गोष्ट मानली जाते. मग ते शाहरुख खान आणि सलमान खान यांचा ‘करण- अर्जुन’ असो किंवा मग सलमान आणि आमिर खान यांचा ‘अंदाज अपना- अपना’ असो. चाहत्यांनी या सिनेमांना भरभरून प्रेम दिलंय. जेव्हा सलमान आणि आमिरचा ‘अंदाज अपना-अपना’ हा सिनेमा आला, तेव्हा या सिनेमाने प्रेक्षकांमध्ये खास स्थान निर्माण केलं होतं. सलमान आणि आमिर आता खूपच चांगले मित्र आहेत, पण ‘अंदाज अपना-अपना’ सिनेमावेळी यांच्यातही जरा बिनसलं होतं. ऑनस्क्रीन तर यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती, पण ऑफस्क्रीन मात्र, ‘कुछ तो गडबड थी’ असंच म्हणावं लागेल. आमिरला सलमानचं वागणं पटतच नव्हतं. कशामुळं त्यांच्यात खटके उडाले होते, सलमाननं असं काय केलं होतं, आणि नंतर सलमाननेच आमिरची कशी मदत केली, हे या लेखातून जाणून घेऊया.
तो काळ होता 1991 चा. याच वर्षी ‘अंदाज अपना- अपना’ सिनेमाची शूटिंग सुरू होणार होती. यादरम्यान कास्टचं काम सुरू होतं. यासाठी आमिर आणि सलमान खान यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. सुरुवातीला या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे गोंधळले होते की, आमिर आणि सलमानसोबत एकत्र सिनेमा बनवायचा की नको? त्यावेळी निर्माते विनय यांनी सल्ला दिला होता की, दोघांसोबतच सिनेमा बनवला तर चांगलं राहील. त्यासाठी त्यांनी सलमानला फोन केला आणि त्यानंतर सन अँड सॅन्ड हॉटेलात आमिर आणि सलमानसोबत एक मीटिंग ठेवली. या मीटिंगपूर्वी संतोषी यांनी सिनेमाची आयडिया तयार केली. उभरत्या सलमान आणि आमिर या स्टार्ससोबत ही आयडिया शेअर करण्यात आली. सलमान आणि आमिर दोघेही यात इंट्रेस्टेड होते. यानंतर अभिनेत्री म्हणून रवीना टंडन आणि करिश्मा कपूरला घेतले.
संतोषी यांच्यानुसार ‘अंदाज अपना-अपना’ सिनेमाची शूटिंग 1991 साली सुरू झाली. या सिनेमाचा श्रीगणेशा दिग्गज स्टार्स धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी केला. पण वर्तमानपत्रांमधील गॉसिप्सच्या कॉलमपासून ते फिल्मी मॅगझिनपर्यंत ‘अंदाज अपना-अपना’च्या सेटवर सलमान आणि आमिरमध्ये काहीतरी बिनसल्याच्या बातम्या छापल्या गेल्या होत्या. सिनेमाशी जोडलेल्या काहींनी म्हणलं होतं की, सलमान आणि आणिर सेटवर एकमेकांसोबत बोलतही नव्हते. पण संतोषी यांनी या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. कारण हा कॉमेडी सिनेमा होता. सगळा खेळ अभिनेत्यांच्या कॉमेडी टायमिंग आणि त्यांच्यातील केमिस्ट्रीचा होता. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि आमिरमध्ये मैत्री तर झाली नाही, पण दोघे कामाच्या बाबतीत एकदम गंभीर होते.
या सिनेमाच्या रिलीझनंतर तब्बल 19 वर्षांनी 2023 साली आमिरने यावर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं, ते करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये.
आमिर म्हणाला होता की, “अंदाज अपना- अपना या सिनेमात सलमानसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच वाईट होता. मला तो अजिबात आवडला नव्हता. मला तो गर्विष्ठ आणि इतरांची काळजी न करणारा व्यक्ती वाटला. मी पुढंही सलमानला अनेकदा भेटलो, पण आम्ही फक्त हाय-हॅलो करायचो. ‘अंदाज अपना-अपना’मध्ये त्याच्यासोबत काम केल्यानंतर मला असं वाटलं की, आता आपल्याला या माणसापासून दूर राहावे लागेल.”
पण याच मुलाखतीवेळी आमिरनं सांगितलं की, सलमानबद्दल त्याचा गैरसमज कसा बदलला. विशेष म्हणजे, २००२ साली रीना दत्तासोबत आमिरचा घटस्फोट झाल्यानंतर. आमिरनं पुढं सांगितलं होतं की, “2002 मध्ये रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर मी दीड वर्ष घरात स्वत:ला कोंडून घ्यायचो. माझी तब्येत बिघडली होती. त्याचवेळी एके दिवशी सलमान आणि माझी भेट झाली. आमच्यात चर्चा झाली. सलमानही म्हणाला की, मी तुझ्या घरी येतो. तो माझ्या घरी आला. आम्ही ड्रिंक करायला एकत्र बसलो. इथं माझं त्याच्यासोबत चांगलं नातं तयार झालं. आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, ज्यामुळे हे नातं अजूनच घट्ट झालं. तेव्हाच मला जाणवलं की, सलमान अंदाज अपना- अपनाच्या दिवसांसारखा अहंकारी आणि बिघडलेला नाही. तो आता मॅच्युअर झालाय. त्याला भेटून मला जाणवलं की, तो एक मोठ्या मनाचा आणि कमाल माणूस आहे.”
यानंतर सलमान आणि आमिर चांगले मित्र बनले. सलमान आणि आमिरचा एकत्र काम केलेला हा एकमेव सिनेमा होता.
आता व्हिडिओचा शेवट करतेय तर या सिनेमाविषयी रंजक माहितीही सांगून जाते. हा सिनेमा बनायला तब्बल ३ वर्षे लागली होती. हा सिनेमा 4 नोव्हेंबर, 1994 रोजी चित्रपटगृहात रिलीझ झाला. सिनेमातील कलाकारांच्या केमिस्ट्रीने जरी सर्वांची मने जिंकली असली, तरीही चित्रपटगृहात सिनेमाकडं प्रेक्षकांनी ढुंकूनही पाहिलं नाही. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा लय जोरात आपटला. भारतातील दोन दिग्गज अभिनेत्यांना घेऊन बनलेल्या सिनेमाकडून निर्मात्यांना खूपच अपेक्षा होत्या, पण सिनेमा काय चाललाच नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या’ अभिनेत्रीवर झाली मोठी शस्त्रक्रिया, चाचण्यांमध्ये जे समजले त्यामुळे सर्वच हैराण
अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर आढळल्या जखमा