मोठी बातमी! सलमान खानला हवीये बंदूक, पोलिसांकडे केली मागणी, वाचा सविस्तर

0
80
salman khan
Photo Courtesy : IG / salman khan FC

अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक मुसेवाला याची हत्या करण्यात आल्यानंतर अभिनेता सलमान यालाही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तेव्हापासून सलमान खान याची सुरक्षितता यावर चर्चा होत आहे. अशातच अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी (22 जुलै) रोजी स्वतः मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि स्वसंरक्षणार्थ परवाना असलेली बंदूक मिळण्याची मागणी केली, अशी माहिती समोर येत आहे.

आपल्या सुरक्षेसंदर्भात अपडेट घेण्यासाठी आणि धमकीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी सलमान खान याने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, सलमानला कशा प्रकारची धमकी मिळाली याची आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. ( Salman Khan meet Mumbai Police Commissioner after receiving death threats )

अधिक वाचा –
ब्रेकिंग! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची छाप, पाहा कुणाकुणाला मिळालाय पुरस्कार
ब्रेकिंग! गायक राहुल देशपांडे यांना राष्ट्रीय पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here