Thursday, December 4, 2025
Home कॅलेंडर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय बालकलाकार; जे मोठे झाल्यावरही झाले सुपरस्टार, पाहा फोटो

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय बालकलाकार; जे मोठे झाल्यावरही झाले सुपरस्टार, पाहा फोटो

बॉलीवूड ही भारतातील कोणत्याही अन्य चित्रपट सृष्टीपेक्षा मोठी सिनेसृष्टी आहे. यात अनेक लोकं नशीब आजमावयाला येतात, परंतू फार कमी लोकांना यात यश मिळते. काही सुपरस्टार होतात, काहींना साईड रोल मिळतात तर काही एका सिनेमानंतर गायब होतात. काही लोकं असेही असतात, ज्यांना एकाही चित्रपटात प्रतिभा असूनही संधी मिळत नाही.

काही नशिबवान असेही असतात, ज्यांना बालवयातच मोठ्या भूमिका मिळतात. हे कलाकार वयाने मोठे झाल्यावर तेवढे हिट होतीलच असेही नाही. काही पुढे जाऊन सुपर डुपर हिट झालेत तर काहींना पुढे काम मिळाले नाही. अगदी मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननेही बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. मंडळी विषय बालकलाकारांचा आहे, म्हटल्यावर त्यांच्याबदद्ल काही खास आम्ही नक्कीच सांगणार. तर आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अशा कलाकारांबद्दल आम्ही सांगणार आहोत, ज्यांनी छोटा पडदा तर गाजलवला परंतू आता काय करतायत?

 अविका गौर
‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीची भूमिका साकारत अविका गौर घराघरांत पोहोचली. खूप कमी वयात आपल्या ॲक्टींग करिअरला सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज छोट्या पडद्यावर आपले नाम कमावत आहे. त्यानंतर ती ‘सासुराल सिमर का ‘ या मालिकेत सुद्धा दिसली होती. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटात देखील काम केले आहे. केवळ उत्तर भारतात नव्हे तर दक्षिण भारतीय सिनेमात देखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सन २०१३ मध्ये आलेला ‘उइय्याला जंपाला’ हा तेलुगू तर सन २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘सिनेमा चुपिस्ता मामा’ आणि सन २०१९ मधील ‘राजू गारी गदी’ या चित्रपटात देखील तिने अभिनय केला आहे.

किंशुक वैद्य
किंशुक वैद्य छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘शाकालाका बूम बूम’ मध्ये संजूच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला. अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला आहे. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो ‘एक रिश्ता साझेदारी का’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसला. तो या मालिकेत मुख्य भूमिकेत पहायला मिळतो. त्यानंतर तो ‘जात ना पुछो प्रेम की’ या मालिकेत देखील काम करताना दिसला होता. लहान वयात आपल्या अभिनयाची छाप पडणारा किंशुक मोठा होऊन देखील तितकाच लोकप्रिय ठरला आहे. त्यानंतर ‘कर्णसंगीनी’ या मालिकेत देखील त्याने अभिनय केला होता.

रजत टोकस
बालकलाकार म्हणून टीव्ही विश्वास पाऊल ठेवणारा रजत याने सन१९९९ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. सर्वप्रथम तो ‘जादुई चिराग’ या कार्यक्रमात अभिनय करताना दिसला. त्यानंतर बोंगो, लाइटहाऊस, एक नजर की तमन्ना, मेरे दोस्त, है हवाए या कार्यक्रमात बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची उत्तम छाप सोडताना दिसला होता. सन २००६ मध्ये आलेली ‘धरती का वीर पृथ्वीराज’ ही त्याची मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकेत देखील काम केले होते. त्याची जोधा अकबर ही मालिका आजदेखील प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून आहे. तो नागीण ३ या मालिकेमध्ये शेवटचा दिसला होता.

आदिती भाटिया
स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहोबते’ या मालिकेत बालकलाकार म्हणून काम करणारी आदिती भाटिया हिने कमी वेळात आपले नाव कमावले होते. तिने जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरवात केली होती. त्यानंतर ती विवाह, शूट आउट एट लोखंडवाला, द ट्रेन, चान्स पे डान्स या चित्रपटात अभिनय करताना दिसली होती, सोबतच तिने होम स्वीट होम, टशन ए इश्क, कॉमेडी सर्कस , खतरा खतरा या कार्यक्रमात देखील तिने काम केले होते. आपल्या उत्कृष्ट अशा अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केले आहे.

अहसास चन्ना
अहसास की एक भारतीय अभिनेत्री आहे, जी वास्तुशास्त्र, कभी अलविदा ना कहना, माय फ्रेंड गणेशा इत्यादी हिंदी चित्रपटातील बालकलाकार म्हणून दिसली. तिचे वडील हे निर्माते असून आई है एक अभिनेत्री आहे. चार वर्षाची असताना तिने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. या व्यतिरिक्त तिने सन २०१३ मध्ये डिजनी चॅनलवरील ओये जस्सी या मालिकेत देखील काम केले होते. ‘वास्तूशास्त्र’ या या चित्रपटात तिने सुश्मिता सेनच्या मुलाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना फार आवडली होती. या व्यतिरिक्त तिने अनेक तामिळ आणि तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे.

हे देखील वाचा