डान्स रियॅलिटी शो ‘डीआयडी सुपर मॉम्स’चे तिसरे पर्व सध्या खूप चर्चेत आहे. यामध्ये ७६ वर्षीय वयस्कर महिलेने नृत्य करणे असो किंवा विवाह एपिसोडमध्ये परीक्षकांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल केलेले खुलासे असो, हा शो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या शोचे परीक्षण इंडस्ट्रीतील तीन प्रतिभावान स्टार्स करत आहेत. त्यामध्ये नृत्य प्रशिक्षक आणि निर्माता रेमो डिसूझा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री भाग्यश्री. सर्वात मनोरंजक अँकरपैकी एक जय भानुशाली या शोचे सूत्रसंचालन करत आहे.
बबलीला दर ३० मिनिटांनी लागते भूक
या शोमध्ये दर आठवड्याला मनोरंजन विश्वाशी निगडित सितारे आपल्या उपस्थितीने, वातावरणात मजेची भर घालतात. यावेळी रॅपर बादशाह (Badshah) आणि गायिका पायल देव (Payal Dev) या शोची मजा वाढवण्यासाठी येणार आहेत. शोच्या प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की, ‘चुडिया खनक गई’ या गाण्यावरील स्पर्धक बबलीचे नृत्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र, बबलीला दर ३० मिनिटांनी भूक लागल्याचे समजल्यावर बादशाह अधिकच चकित होतो.
बादशाह आणि रेमो बनले शेफ
यानंतर शोची स्पर्धक बबली म्हणते की, “तिची भजी खाण्याची इच्छा होत आहे.” मग काय, जयने बादशाह आणि रेमो (Remo D’Souza) यांना भजी तळायला सांगितले आणि दोन्ही दिग्गजांनी त्यांचे स्वयंपाक कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्याचा गायक बादशाह आणि रेमो यांनी बटाटे, पनीर आणि कांदे यांचे भजी बनवून स्पर्धकांना दिले. त्यांनी मोठ्या मेहनतीने भजी तळले असले, तरी स्पर्धकांनी खाल्ल्याबरोबर त्यात मीठ कमी होते. परंतु त्यांच्या उर्वरित मेहनतीची प्रशंसा केली गेली. यावेळी बादशाह म्हणाला, “उफ! ओह माय गॉड, मला वाटते की, मी आतापर्यंत चुकीच्या क्षेत्रामध्ये होतो. मी तर शेफ होऊ शकतो.”
View this post on Instagram
शोबद्दल बोलायचं झालं तर, सगळेच स्पर्धक आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देत आहेत आणि शर्यत हळुहळू जोर धरत आहे.
हेही वाचा-
–‘झाँसी की राणी’ चित्रपट बनवण्यासाठी सोहराब मोदींनी घेतली होती तब्बल ५० लेखकांची मदत, वाचा संपूर्ण कहाणी
–राज कपूरसाेबतच्या अफेअरवर झीनत अमानने ताेडले माैन; म्हणाल्या, ‘देव आनंदला असं वाटलं…’