Tuesday, June 25, 2024

लग्नाच्या अनेक वर्षांनी भाग्यश्रीने केला खुलासा, ‘या’ कारणामुळे पतीने दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार

मैंने प्यार किया‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री भाग्यश्रीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. भाग्यश्रीचे लग्न हिमालय दसानीशी झाले होते, जो व्यवसायाने अभिनेता, निर्माता आणि व्यावसायिक आहे. भाग्यश्री पती हिमालयासोबत ‘कैद में है बुलबुल’, ‘त्यागी’ आणि ‘पायल’ सारख्या चित्रपटात दिसली आहे. भाग्यश्रीचे मानायचे झाले तर तिचा नवरा हिमालय तिच्याबद्दल खूप सकारात्मक आहे आणि याच कारणामुळे तिला इच्छा नसतानाही अनेक चित्रपट गमवावे लागले. मैने प्यार किया ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. आज या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 फेब्रुवारी 1969 या रोजी झाला. याच निमित्ताने तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणुन घेऊ या. 

भाग्यश्री म्हणते, “माझं लग्न अशा घरात झालं होतं, जिथे चित्रपटाशी दूरदूरपर्यंत कुणाचाही संबंध नव्हता. अशा परिस्थितीत, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आयुष्य वेगळ्या गतीने चालते हे माझ्या सासरच्या लोकांना समजणे देखील खूप कठीण होते.

भाग्यश्री म्हणते की, “घरात प्रवेश करताच मी अभिनेत्री भाग्यश्री राहिली नाही, तर घरातील सर्व कामे सामान्य गृहिणीप्रमाणे करायची.” तिच्या करिअरबद्दल आणि पतीबद्दल बोलताना भाग्यश्री म्हणते, “माझा नवरा हिमालय खूप पझेसिव्ह आहे, त्यामुळे मी अनेक चित्रपटांमध्ये काम करू शकले नाही.”

तिचा मुद्दा स्पष्ट करताना भाग्यश्री म्हणते, “या चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन्स होते आणि पती हिमालयाला त्याबद्दल सोयीस्कर वाटत नव्हते, त्यामुळे त्या चित्रपटांना हो म्हणणे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि तरीही माझा प्राधान्य पती हिमालय होता.” अशाप्रकारे तिने तिचा हा अनुभव शेअर केला आहे. (bhagyashree spoke about her very possessive husband himalay dasan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तेव्हा तो क्लासिक सिनेमा बनतो’ म्हणत अभिषेक कपूरने सुशांतची आठवण काढत लिहिली ‘काय पो चे’ सिनेमावर भावनिक पोस्ट
‘या’ कारणामुळे भाग्यश्रीचा पती होता नाराज, अभिनेत्रीने लग्नानंतरच्या दिवसांचा केला खुलासा

हे देखील वाचा