बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉटनेस आणि फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. मलायकाचे लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. अलीकडेच या अभिनेत्रीचा एक लूक चर्चेत आला आहे. मलायका अरोराचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. मलायकाला अनेकदा जिममध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात पाहिले जाते. सध्या मलायका अरोराचे काळ्या ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मलायका झाली ड्रेसमुळे नाराज
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका (Malaika Arora) तिच्या ड्रेसमुळे खूपच नाराज दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मलायकाच्या डीप नेक ड्रेससमोर एक व्यक्ती तिच्या हाताने काही हावभाव करते, त्यानंतर मलायका तिचा ड्रेस नीट करते. ड्रेस फिक्स केल्यानंतर मलायकाही डोके धरून बसलेली दिसते. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
काय होता मलायकाचा लूक
मलायका अरोराच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर ती डीप नेक ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा नेटचा ड्रेस घातला आहे. लूकला चार चाँद लावण्यासाठी मलायकाने तिचे केस मागे घेतले आहेत. तिच्या हील्समुळे ती चालताना अजूनच सूंदर दिसत आहे.
नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांची बरसात
व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. एका इंस्टाग्रामवर पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवर नेटकरी भरपूर कमेंट करत आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना एका युजरने लिहिले आहे की, “मलायका अरोरा ४८ वर्षांची आहे, पण दिसते मात्र ३० ची. तू स्वतःला किती व्यवस्थित सांभाळले आहे.” त्याचवेळी, आणखी एका युजरने कमेंट केली की, “वयाच्या ४०व्या वर्षीही तिने स्वत:ला उत्तम प्रकारे सांभाळले आहे, या सुंदर महिलेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.”
मलायका मागील काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. यादरम्यानचे त्यांचे फोटो जोरदार व्हायरल झाले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बादशाहला नव्हते बनायचे गायक?, म्हणाला, ‘आतापर्यंत चुकीच्या ठिकाणी होतो…’
तिसऱ्यांदा गरोदर राहिल्याच्या बातम्यांवर संतापली करीना; म्हणाली, ‘मी काय यंत्र…’
प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये बिपाशाच्या लेटेस्ट पोस्टवर खिळल्या सर्वांच्या नजरा, फोटोमध्ये काय आहे खास?