कुणाल खेमुच्या व्हाइब या चित्रटाने देशांतर्गत बाॅक्स ऑफिसवर बरी सुरुवात केली आहे. त्याने दयारा या चित्रपटालाही कमाईमध्ये मागे टाकले आहे. पण अपेक्षेपेक्षा थोडी कमी कमाई केली आहे. कुणाल खेमूने या विनोदी चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे आणि तो यात मुख्य अभिनेता म्हणूनही दिसला आहे. तसेच यात स्पर्श श्रीवास्तव, वंशिका धीर, यशपाल शर्मा आणि दिनेशलाल यादव यांच्याही भुमिका आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
सॅकएनआयएलस नुसार, ‘व्हाइब’ने भारतात पहिल्या दिवशी 3,194 शोजमधून अंदाजे 15 दशलक्ष रुपये निव्वळ आणि 18 दशलक्ष रुपये एकूण कमाई केली. चित्रपटाची एकूण प्रेक्षकसंख्या 13.38% होती, ज्यात सकाळच्या शोची 6%, दुपारच्या शोची 11.31%, संध्याकाळच्या शोची 13.92% आणि रात्रीच्या शोची 22.31% होती.
दारा हा चित्रपट पण नुकताच रीलीज झाला असुन बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला वाईब मागे टाकले आहे. आणि पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली आणि भारतात 9 दशलक्ष निव्वळ कमाई केली.
वाइब (vibe)हा चित्रपट दोन जिवलग मित्रांची कथा सांगणारा चित्रपट आहे. पण त्याच्या जिवणात असे काही वळण येतात. तरी देखील ते एकमेंकाची साथ देत एक भयानक गोष्टीचा पर्दाफाश करतात. आणि मग त्यानंतर काॅमेडी साहसाची सुरुवात होते. कुणाल खेमूने खुलासा केला की, त्याने ‘वाइब’ या चित्रपटात आपल्या सासूबाई शर्मिला टागोर यांना एका कॅमिओ भूमिकेसाठी दिग्दर्शित केले होते.
हेही वाचा
सेन्सॉर बोर्डाची नवी टीम जाहीर, या दिग्गज कलाकारांचा आहे समावेश










