मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये मराठी सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी अंबिये (Kishori Ambiye) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अनेक विनोदी तसेच खलनायकी भूमिका साकारत किशोरी अंबिये यांनी मराठी टेलिव्हिजनवर जोरदार लोकप्रियता मिळवली आहे. सध्या त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी नेटकऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
किशोरी अंबिये या मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. माझ्या नवऱ्याची बायको, सहकुटूंब सहपरिवार सारख्या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे आणि भूमिकांचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळेच त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या नेहमीच विविध पोस्ट करत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या सेटवरील विविध व्हिडिओ पोस्ट करत असतात. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
किशोरी अंबियेचा हा व्हिडिओ मेकरुममधील आहे. या व्हिडिओमध्ये किशोरी मजेशीर रील बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या “ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत, त्यांनी दुसऱ्या डोळ्यांनी पाहायचा प्रयत्न करा,” कदाचित आवडू लागतील असे म्हणले आहे. त्यांच्या या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांच्याही जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत असून व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान किशोरी अंबेयी या मराठी सिनेजगतातील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आपल्या अभिनय कारकिर्दित त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘सालीने केला घोटाळा’, ‘खुर्चीसम्राट’, ‘सारेच सज्जन’, ‘बाळा जो जो रे’, अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक विनोदी तसेच खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
हेही वाचा –
टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा
‘खतरों के खिलाडी १२’ शोला परवडेना प्रतीक?, जीव धोक्यात घालण्यासाठी आकारतो ‘एवढे’ लाख
ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास










