Thursday, September 28, 2023

टॉपलेस फोटोशूट ते दिग्दर्शकासोबतचा वाद, ‘या’ कारणांमुळे वादात सापडली होती ‘बर्थडे गर्ल’ कियारा

कियारा अडवाणी (Kiara Advani) ही सध्या हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कियाराने दाक्षिणात्य सिने जगत ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास केला आहे. आज (३०जुलै) अभिनेत्री कियारा अडवाणीचा वाढदिवस. आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली कियारा अनेकवेळा वादातही सापडली आहे. जाणून घेऊ या तिच्या या वादाचे हे गाजलेले किस्से. 

टॉपलेस फोटोने केली होती खळबळ – आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली कियारा सोशल मीडियावरही सक्रिय झाली होती. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. कियाराची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. कियाराने टॉपलेस फोटोशूट करत खळबळ माजवली होती. या फोटोमध्ये कियाराने एका झाडाच्या पानाने तिचे शरीर झाकले होते.या व्हायरल फोटोशूटमुळे कियाराला जोरदार ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.

सोशल मीडिया पोस्ट प्रमाणेच कियारा अडवाणीची लस्ट स्टोरी ही वेबसिरीजही प्रचंड गाजली होती. या सिरीजमध्ये तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तिच्या या सीनमुळे सोशल मीडियावर असंख्य मेम्सही तयार झाले होते.

कबीर सिंगमधील वाद – कियारा अडवाणी आणि शाहीद कपूर यांचा कबीर सिंग हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात कबीर सिंगने कियाराच्या कानाखाली लगावली होती. चित्रपटातील हा सीन जितका गाजला तितकीच त्याच्यावर जोरदार टिकाही झाली होती.

भारत अने नेणू वाद – अभिनेत्री कियारा अडवाणी आणि दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा bharat ane nenu हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामधील कियारा अडवाणीबद्दलचा एक रंजक किस्सा समोर आला होता. तो म्हणजे चित्रपटाच्या निर्मात्यांनी कियाराचे संपूर्ण मानधनच दिले नसल्याची सिने जगतात चर्चा  रंगली होती. ज्यानंतर कियाराने यावर असे काही नसल्याचे स्पष्टिकरण दिले होते.

अधिक वाचा- 
जेव्हा टॉपलेस फोटोने उडवली खळबळ, आतापर्यंत बऱ्याच वादांमध्ये अडकलीय कियारा अडवाणी
अर्रर्र, हे काय झालं! अभिनेत्री क्रिती सेननच्या चेहऱ्यावर दिसली सूज, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा