Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

तब्बल २७ वर्षांपूर्वी अभिनेत्रीच्या मागे नाचणारा रेमो आज बनलाय प्रसिद्ध कोरिओग्राफ्रर, व्हिडिओ केला शेअर

जर आपण मेहनत घेतली, तर आज आपण जे आहोत, ते आपण उद्या नसतो. म्हणजेच, यशाचे शिखर गाठण्यापासून आपल्याला कुणीच रोखू शकत नाही. याचा प्रत्यय आपल्याला कलाविश्वातून अनेकदा येतच असतो. एकेकाळी कलाकारांच्या मागे डान्स करणाऱ्या रेमो डिसूझा याचाही या यामध्ये समावेश होतो. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. रेमोच्या कारकीर्दीत अनेक मोठे बदल झाले आहेत. तोदेखील आता प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. तो सध्या ‘डीआयडी सुपर मॉम्स ३’ शोमध्ये परीक्षक आहे. यावेळी त्याच्यासोबत उर्मिला मातोंडकर आणि भाग्यश्री परीक्षक म्हणून दिसत आहेत.

रेमो डिसूझा (Remo DSouza) याच्यासाठी ही खूपच सन्मानाची बाब आहे की, तो उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिच्यासारख्या शानदार अभिनेत्रीसोबत स्टेज शेअर करत आहे. रेमोने अभिनेत्रीप्रती असलेला सन्मान आणि आभार मानण्यासाठी सोशल मीडियावरून ‘रंगीला’ या सिनेमातील ‘याई रे याई रे’ गाण्यातील छोटी क्लिप शेअर करत मनातली गोष्ट सांगितली आहे.

उर्मिला मातोंडकरसोबत डान्स करताना दिसला रेमो डिसूझा
रेमोने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी यशाचे स्वप्न कधीही पाहिले नाही. मी फक्त हे मिळवण्यासाठी काम केले. उर्मिला मातोंडकर मॅडम, तुमच्यासोबत स्टेज शेअर करणे, माझे सौभाग्य आहे.” हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला ‘याई रे याई रे’ गाण्याची क्लिप आहे, ज्यामध्ये रेमो, उर्मिलाच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसत आहे. यानंतर व्हिडिओमध्ये ‘डीआयडी सुपर मॉम्स ३’मधील क्लिप दिसते. त्यामध्ये उर्मिला आणि रेमो मंचावर ‘याई रे याई रे’ या गाण्यावर थिरकताना दिसतात.

रेमो डिसूझा चाहत्यांना करतोय प्रेरित
रेमोने या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तो बॅकग्राऊंड डान्सरपासून ते एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि सुपर परीक्षक बनला आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते त्याची प्रशंसा करत आहेत. तसेच, त्याच्या आयुष्यापासून प्रेरणा घेत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “सर, तुम्ही माझ्यासाठी मेगास्टार आहात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

सिनेमातही झळकलाय रेमो
रेमो डिसूझा याने सिनेमातही काम केले आहे. तो ‘एबीसीडी’, ‘अफलातून’, ‘मीनाक्षी: टेल ऑफ ३ सिटीज’ यांसारख्या सिनेमात झळकला आहे. याव्यतिरिक्त त्याने सिनेमांची निर्मितीही केली आहे. त्यामध्ये ‘नवाबजादे’ आणि ‘डेथ ऑफ अमर’ यांसारखे सिनेमे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
इंदिरा गांधींनंतर आणखी एक राजकीय भूमिका साकारणार कंगना, मधुर भांडाकर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
संस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद
चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री

हे देखील वाचा