संस्कार हो दुसरं काय! आर माधवनने रजनीकांत यांचे पाय शिवत घेतला आशीर्वाद, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद

‘मॅडी’ म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याचा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्याच्या सिनेमाचे नाव ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ असे आहे. या सिनेमामुळे तो सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला समीक्षक आणि चाहत्यांकडून जोरदार पसंती मिळाली. विशेष म्हणजे, या सिनेमाचे दिग्दर्शनही त्याने स्वत:च केले आहे. या सिनेमाबाबत ट्विटरवर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशातच माधवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याच्या व्यवहारावरून त्याचे कौतुक केले जात आहे.

माधवनने घेतला रजनीकांत यांचा आशीर्वाद
खरं तर, नुकतेच आर माधवन (R Madhavan) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. या व्हिडिओत रजनीकांत माधवनच्या खांद्यावर शाल ओढतात, त्याचवेळी अभिनेता सन्मानपूर्वक आपली मान खाली करतो आणि पायाला हात लावत रजनीकांत यांचे आशीर्वाद घेतो. दोघांचा विनम्रपणा पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे. तसेच, या व्हिडिओत इस्रोचे माजी वैज्ञानिक नंबी नारायण हेदेखील सोबत बसल्याचे दिसत आहेत. ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा सिनेमा नंबी नारायण यांच्या आयुष्यावरच आधारित आहे.

रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन आनंदी झाला माधवन
माधवन याने हा व्हिडिओ शेअर करत रजनीकांत यांना त्यांच्या शब्दांसाठी आणि आपुलकीबद्दल धन्यवाद दिला. त्याने लिहिले की, “जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीच्या वन मॅनकडून आशीर्वाद मिळतो, जो अनंत काळासाठी एक खास क्षण आहे. रॉकेट्रीवर तुम्ही काढलेल्या प्रशंसनीय शब्दांसाठी आणि आपुलकीसाठी धन्यवाद रजनीकांत सर. या प्रेरणेने आम्हाला पूर्णपणे जिवंत केले आहे. आमचे तुमच्यावर प्रेम आहे.” विशेष म्हणजे, रजनीकांत यांनीही माधवनच्या या सिनेमाचे कौतुक केले आहे.

तब्बल ६ भाषांमध्ये प्रदर्शित झाला सिनेमा
आर माधवन याच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ हा सिनेमा १ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमात माधवन याने रॉकेट वैज्ञानिक नंबी नारायणन यांची भूमिका साकारली आहे. तसेच, त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांवरही प्रकाश टाकला. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, याच्या तमिळ व्हर्जनमध्ये सूर्याने कॅमियो केला आहे, तर हिंदी आणि इंग्रजी व्हर्जनमध्ये शाहरुख खान याने एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
चंकी पांडेच्या लेकीला ‘सपाट छातीवाली’ म्हणत ट्रोल करायचे लोक, वेदना सांगताना हळहळली अभिनेत्री
‘सर्व शक्ती पणाला लावावी लागेल’, बॉलिवूड सिनेमांबाबत असे का म्हणाला करण जोहर? जाणून घ्याच
हॉटनेसचा तडका! छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पाण्यातच झाली बोल्ड, फोटोवर धडाधड पडला कमेंट्सचा पाऊस

Latest Post