हिंदी चित्रपटसृष्टीतून आज आणखी एक तारा विझला आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (mithilesh chaturvedi) यांचे लखनऊ येथे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी निधन झाले. त्यांनी ०३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते बरेही झाले होते, मात्र काही वेळातच त्यांना त्यांच्या मूळ गावी हलवण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्याने ‘फिजा’, ‘कोई मिल गया’, ‘क्रेझी ४’ आणि ‘रेडी’ सारख्या हिट चित्रपटात काम केले होते. याशिवाय तो सनी देओलच्या ‘गदर: एक प्रेम कथा’, मनोज बाजपेयीचा ‘सत्या’, शाहरुख खानचा ‘अशोका’ यासह ‘ताल’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘रेडी’मध्ये दिसला होता. पण ‘कोई… मिल गया’ या चित्रपटातील त्यांचे काम सर्वाधिक लोकप्रिय ठरले. या चित्रपटात त्याने हृतिक रोशनच्या संगणक शिक्षकाची भूमिका साकारली होती.
दिवंगत अभिनेत्याने मानिनी डेसोबत ‘टॅली जोडी’ नावाची वेब सीरिजही साइन केली होती. गेल्या वर्षी अनेक आगामी मालिकांसाठीही या अभिनेत्याची निवड झाल्याची बातमी आली होती. मात्र या मालिका कोणत्या आहेत याचा खुलासा झालेला नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे या गायकांचे मानधन, एका गाण्याची रक्कम ऐकून बसेल धक्का