बाबो! अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे या गायकांचे मानधन, एका गाण्याची रक्कम ऐकून बसेल धक्का

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या भरमसाठ मानधनाची त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होताना दिसत असते. कोणाचे मानधन किती, कोणाचे मानधन सर्वाधिक आहे. याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. सिने जगतातील मानधनाबद्दल तर सर्वांना माहितच आहे. परंतु सिनेसृष्टीचा अविभाज्य घटक असलेल्या संगीत क्षेत्रातील गायकांचेही मानधन भलेमोठे असते.  या गायकांचे मानधनही चित्रपटातील अभिनेत्याइतकेच असते. चला तर जाणून घेऊया या संगीत क्षेत्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांबद्दल.

नेहा कक्कर– नेहा कक्कर हे आज गायनाच्या विश्वातील एक मोठे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, तिने आपल्या गायनाची सुरुवात माता राणीच्या जागरणातून केली होती. यानंतर ती रिअलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये सहभागी म्हणून पोहोचली. तिथे ती शो जिंकू शकली नाही, पण गायिका म्हणून तिला प्रचंड लोकप्रियता झाली. रिपोर्ट्सनुसार, आज नेहा एका गाण्यासाठी 8 लाख रुपये फी घेते.

श्रेया घोषाल– गायनाच्या बाबतीत श्रेया घोषालचे नावही मोठ्या आदराने घेतले जाते. तिने हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेया घोषाल एका गाण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेते.

अरिजित सिंग – अरिजित सिंगच्या आवाजाच्या चाहत्यांची कमी नाही. यामुळेच आजच्या तारखेतील तो एक स्टार गायक आहे. आवाजाच्या या जादूगाराची फीही जोरदार आहे. रिपोर्ट्सनुसार, अरिजित सिंग एका गाण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये घेतात.

मिका सिंग– मिका सिंगने दबंग खान सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत सर्व बड्या स्टार्सची गाणी आपल्या जादुई आवाजाने सजवली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला एका गाण्यासाठी सुमारे 13 लाख रुपये मिळतात. रिपोर्ट्सनुसार, मिका सिंग हा भारतातील सर्वात श्रीमंत गायकांपैकी एक आहे. मिका सिंग एका ब्रँडच्या एंडोर्समेंटसाठी लाखो रुपये घेतात.

सुनिधी चौहान– गायनाच्या दुनियेत सुनिधी चौहानची स्वतःची ताकद आहे. मुळात सुनिधी चौहान उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा शहरातील अर्निया या गावातील आहे. तिने बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले आहे. रिपोर्ट्सनुसार, सुनिधी चौहान एका गाण्यासाठी 10 ते 15 लाख रुपये घेते.

हेही वाचा –

फ्लॉप चित्रपटांचा फटका! अक्षय कुमार- टायगर श्रॉफच्या मानधनात ‘इतकी’ घट

‘लालसिंग चड्ढा’च नव्हे, आमिर खानचे ‘हे’ चित्रपटही आहेत हॉलिवूडची सेम कॉपी

‘माझ्या मुलाला बर्गर विकताना पाहायचयं’ करोडो रुपये कमावणाऱ्या अभिनेत्रीचे अजब स्वप्न

Latest Post