टीव्ही जगतातील अभिनेत्री मालिकामध्ये जितक्या साध्या दिसतात त्या खऱ्या आयुष्यात तितक्याच बोल्ड आहेत . टेलिव्हिजनवरील अशा अनेक साध्या दिसणाऱ्या सून आहेत ज्यांनी प्रेमाखातर समाजाच्या सर्व मर्यादा तोडल्या आणि आंतरधर्मीय विवाह केला आहे.
लोकप्रियतेच्या बाबतीत टेलिव्हिजन कलाकार सुद्धा बॉलिवूडच्या मागे नाही. बॉलिवूड कलाकार ज्याप्रमाणे नेहमीच प्रेक्षकामध्ये चर्चेत असतात त्याचप्रमाणे टीव्ही अभिनेते देखील अधिक चर्चेत असतात. व्यावसायिक ते वैयक्तिक जीवनापर्यंत, हे कलाकार त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहेत. बॉलिवूडप्रमाणेच अनेक टीव्ही कलाकारांनीही आंतरधर्मीय विवाह केले आहेत, ज्यामध्ये टीव्हीवरील अनेक सुनांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होत्या. आज आम्ही अशा काही अभिनेत्रींबद्दल बोलू, ज्यांनी प्रेमासाठी समाजाच्या सर्व मर्यादा तोडून आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत आंतरधर्मीय विवाह केला.
दीपिका कक्कर- शोएब इब्राहिम
शोएब इब्राहिम Shoaib Ibrahim आणि दीपिका कक्कर Dipika kakkar हे टीव्ही जगाचे सुप्रसिद्ध चेहरे आहेत. दोघे ‘ससुरल सिमर का’ च्या मालिकेच्या सेटवर भेटले. त्याचा प्रवास प्रेमाने सुरू झाला आणि लग्नातपर्यत पोहोचला. दीपिकाने शोएबशी लग्न करण्यासाठी तिचा धर्म बदलला. या दोघांनीही सन २०१८ मध्ये लग्न केले आणि आजपर्यंत एकत्र राहत आहेत.
आमना शारीफ- अमित कपूर
आमना शारीफला टीव्ही शो ‘कहीं तो होगा’ या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळाली. ‘काशिश’ नावाने अभिनेत्री ही प्रत्येक घरात पोहचली. आमना यांनी हिंदू धर्माच्या अमित कपूरशी लग्न केले आहे.
छवि मित्तल- मोहित हुसैन
छवि मित्तल हिंदू आहे, परंतु त्यांनी मुस्लिम मोहित हुसेनशी लग्न केले. त्यांचे कुटुंबातील सदस्य दोघांच्या आंतरधर्मीय लग्नासाठी तयार नव्हते, परंतु त्यांनी नंतर छवि आणि मोहितच्या विनवणीस सहमती दर्शविली.
किश्र्वर मर्चेंट- सुयाश राय
किश्र्वर आणि सुयाश हे टीव्ही जगातील एक लोकप्रिय जोडी आहे. चार वर्षांच्या डेटिंगनंतर हिंदू सुयाश आणि मुस्लिम किश्र्वर यांनी २०१६ मध्ये एकमेकांशी लग्न केले.
सनया इरानी- मोहित सहगल
सनया इरानी आणि मोहित सहगल यांनी टीव्ही शो ”मिले जब हम तुम’ दरम्यान भेट झाली होती. ते दोघेही
बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट केले आणि २०१६ मध्ये लग्न केले. सनया पारसी कुटुंबातील आहे आणि मोहित हिंदू कुटुंबातील आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
सनी लिओनीचा बॉलिवूडमध्ये १० वर्ष पूर्ण, ‘त्या’ दिवसांबद्दल केला उघडपणे खुलासा
‘मी तुमच्यासोबत गाणार नाही’, लता दीदींच्या ‘त्या’ वाक्याने दुखावले होते किशोर कुमार
‘कोई मिल गया’ अभिनेत्याचे निधन, राहत्या घरीच मालवली प्राणज्योत