शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी असणाऱ्या शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर यांनी सोशल मीडियावर एक दुःखद बातमी शेअर केली आहे. ते म्हणजे शोएबच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला आहे. याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याने त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना करायला सांगितले आहे. तसेच दीपिका कक्करने देखील शोएबची ही पोस्ट शेअर केली आहे. 

शोएब इब्राहिमने इंस्टाग्राम स्टोरीवर ही माहिती देत सांगितले की, “आता पुन्हा एकदा तुमच्या प्रार्थनेची आणि सोबतीची गरज आहे. पप्पांना रात्री ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. यावेळी ते आयसीयूमध्ये आहेत. कृपया अशी प्रार्थना करा की, ते लवकरात लवकर ठीक होतील.” यासोबतच दीपिका कक्करने देखील तिच्या सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी सांगितले आहे.

शोएब हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अनेकवेळा तो त्याची पत्नी दीपिका कक्करसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत असतो. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. दीपिका देखील अनेकवेळा त्यांचे फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या फॅमिलीसोबतचे अनेक फोटो देखील शेअर करत असते. (Shoaib Ibrahim father hospitalized due to brain stroke)

शोएबच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ‘ससुराल सिमर का’, ‘कोई लौट के आया’ आणि ‘इश्क मैं मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. २०१८ मध्ये त्याने ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील त्याची सह-कलाकार दीपिका कक्कर सोबत लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल कमाल!! सारा अली खानने शेअर केले लाल लेहंग्यामध्ये फोटो; पाहायला मिळालं अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य

-खरंच की काय! ऐश्वर्या राय होणार दुसऱ्यांदा आई? व्हायरल फोटो पाहून सोशल मीडियावर रंगल्यात चर्चा

-‘गुड्डी माझी सर्वात मोठी फॅन होती…’ म्हणत, धर्मेंद्र यांनी जया बच्चनसोबतच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा


Leave A Reply

Your email address will not be published.