Saturday, March 15, 2025
Home साऊथ सिनेमा ‘अभिनेत्री असली तरी संस्कार का विसरु?’ पतीची पूजा केल्यानंतर ट्रोल झालेल्या अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

‘अभिनेत्री असली तरी संस्कार का विसरु?’ पतीची पूजा केल्यानंतर ट्रोल झालेल्या अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

तेलगू अभिनेत्री प्रणिता सुभाषला (Pranitha Subhash) बऱ्याच दिवसांपासून ट्रोलचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. प्रणिता सुभाषने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये ती पती नितीन राजूच्या पायाशी बसून पाय धुताना  दिसली होती. हे फोटो समोर आल्यानंतर युजर्स चांगलेच संतापले होते. अभिनेत्रीला या व्हायरल फोटोनंतर जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान आता यावर अभिनेत्री प्रणिताने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अलिकडेच अभिनेत्री प्रणिता सुभाषने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये प्रणिता सुभाष पती नितीन राजूच्या पायाशी बसून पूजा करत आहेत. तिच्या हातात आरतीचे ताट आहे, ज्यातून ती पतीच्या चरणांची आरती करत आहे. यासोबतच त्याच्यावर फुलेही अर्पण केले जात आहेत. सोशल मीडियावर प्रणिताच्या या फोटोंवरुन वाद सुरू झाला आहे. अनेकांनी तिच्या या कृतीला पुरुषप्रधान संस्कृतीचे उदाहरण असल्याचे म्हणले आहे. अशा परिस्थितीत आता प्रणिताने ट्रोल्सना उत्तर दिले आहे.

भीमना अमावस्येच्या आनंदात प्रणिता सुभाषने पतीची पूजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. असे म्हणतात की भीमना अमावस्येच्या दिवशी स्त्रिया आपल्या पती आणि घरातील इतर पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. ट्रोल झाल्यानंतर आता प्रणिता एका मुलाखतीत याविषयी बोलली आणि म्हणाली, ‘आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. या प्रकरणात 90 टक्के लोकांनी फक्त चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत. मी इतरांकडे दुर्लक्ष करते.

 

प्रणिता सुभाष पुढे म्हणते की, “मी एक अभिनेत्री आहे आणि माझे क्षेत्र ग्लॅमरसाठी प्रसिद्ध आहे, याचा अर्थ असा नाही की मी कोणतीही प्रथा पाळू शकत नाही, विशेषत: जेव्हा मी त्याला पाहत मोठी झाले आहे आणि त्यात पूर्णपणे विश्वास ठेवला आहे. माझ्या सर्व चुलत भाऊ, शेजारी आणि मित्रांनी हे केले आहे. मी गेल्या वर्षीही पूजा केली होती, जेव्हा माझे नवीन लग्न झाले होते. पण फोटो शेअर केले नाहीत.” दरम्यान प्रणिताच्या या स्पष्टिकरणानंतरही तिच्यावर जोरदार टिका होताना दिसत आहे.

हे देखील वाचा