Wednesday, March 29, 2023

‘या’ एका व्यक्तीने घोळ घातला नसता तर; मन्नतचा मालक सलमान खान असता, खुद्द भाईजानने केला खुलासा

सिनेसृष्टीतील कलाकारांची त्यांच्या अभिनयाइतक्याच ऐशारामी जीवनशैलीसाठीही विशेष चर्चेत असतात. त्यांच्या आलिशान गाड्यांची, कपड्यांची चर्चा तर होतेच. त्याचबरोबर या कलाकारांच्या घरांचीही नेहमीच चर्चा होताना दिसत असते. अभिनेते अमिताभ बच्चन असो किंवा शाहरुख खानचा मन्नत असो या कलाकारांच्या निवासस्थानाची नेहमीच चर्चा होते. शाहरुख खानचा मन्नत बंगला यामध्ये नेहमीच आघाडीवर असतो. शाहरुखच्या चाहत्यांनाही त्याच्या या घराचे आकर्षण आहे. परंतु याबद्दलची खुप कमी जणांना माहिती आहे की शाहरुख खानचा हा बंगला सलमान खानचा असता परंतु एका व्यक्तीमुळे सलमानचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

शाहरुख खान (Shahrukh Khan)  त्याच्या फिल्मी करिअरसोबतच त्याच्या मन्नत या आलिशान बंगल्याबद्दलही खूप चर्चेत आहे. त्याचा बंगला एखाद्या आलिशान राजवाड्यासारखा आहे, जो मुंबईतील प्रेक्षणीय स्थळ बनला आहे. त्याच्या बाहेर  फोटो घेण्यासाठी दररोज हजारो लोक जमतात. पण तुम्हाला माहित आहे का की किंग खानच्या आधी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हे घर खरेदी करणार होता.अलीकडेच सलमान खानने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

संवादादरम्यान सलमान खानला विचारण्यात आले की, “मला एक गोष्ट सांगा जी शाहरुखकडे आहे आणि तुमची इच्छा आहे की ती तुमच्यासोबत असावी.” त्याला उत्तर देताना भाईजानने मन्नतचे नाव घेतले. त्याचबरोबर एकेकाळी ते खरेदी करणार असल्याचेही त्याने नमूद केले. सलमान खानने सांगितले की, “त्याला मन्नतला खरेदी करण्याची ऑफर शाहरुखच्या आधी आली होती आणि त्यालाही ती खरेदी करायची होती, पण जेव्हा त्याने त्याचे वडील सलीम खान यांना याबाबत सांगितले तेव्हा ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या घराचे काय करणार. त्यानंतर त्याने मन्नतला खरेदी करण्याची ऑफर नाकारली.”

शाहरुख खानने मन्नतला 2001 मध्ये 13.32 कोटींना खरेदी केले होते. त्याचवेळी, माध्यमांवर विश्वास ठेवला तर आज त्याची किंमत 200 कोटींहून अधिक आहे. मात्र, एकीकडे शाहरुख खान या आलिशान पॅलेसमध्ये राहतो, तर दुसरीकडे सलमान खान मन्नतजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो.(before shahrukh khan mannat was offered to salman khan actor deny the deals

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’

हे देखील वाचा