बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कटपुतली’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते खूप दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटात अक्षय पुन्हा एकदा पोलिसांच्या गणवेशात दिसणार आहे. यावेळी तो हत्येचे गूढ उकलताना सीरियल किलरला पकडताना दिसणार आहे. आदल्या दिवशी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यामध्ये हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले होते.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित कठपुतली चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता अक्षय कुमार यानेच या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबाबत माहिती दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून चित्रपटाचा ट्रेलर लोकांसोबत शेअर केला आहे. यासोबतच त्याने “तीन हत्या, एक शहर.. एक पोलिस आणि एक सिरीयल किलर कठपुतली, 2 सप्टेंबरला फक्त डिस्ने + हॉटस्टारवर.” असा कॅप्शन दिला आहे.
या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याचा टीझर जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला. टीझरमध्ये अक्षयच्या झलकसोबतच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्याचा टीझर शेअर करताना अक्षय कुमारने एक मनोरंजक कॅप्शनही लिहिला होता. या कॅप्शनमध्ये अक्षय कुमारने हा खेळ सत्तेचा नसून डोक्याचा असल्याचा खतरनाक कॅप्शन दिला होता.
विशेष म्हणजे या वर्षात आतापर्यंत अक्षयचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांचा ‘बच्चन पांडे’ हा पहिला मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता पण हा चित्रपट लोकांना आवडला नाही. यानंतर त्याचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्याचवेळी त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘रक्षा बंधन’ या चित्रपटानेही त्याची निराशा केली आहे. आतापर्यंत हा चित्रपट समाधानकारक कमाई करू शकलेला नाही.
हेही वाचा –
व्हायरल व्हिडिओनंतर करणसिंग ग्रोवर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; म्हणाले, ‘तो बायकोच्या जिवावर जगतो…’
पत्रकारासमोरचं विजय देवरकोंडाने केले ‘असे’ कृत्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप










