‘लालसिंग चड्ढा’नंतर ‘या’ कारणामुळे अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ वादाच्या भोवऱ्यात, बॉयकॉट करण्याची प्रेक्षकांची मागणी

सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan) चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘रक्षा बंधन’ 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. एकीकडे आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. दुसरीकडे, रिलीज होण्याच्या एक आठवडा आधीच अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘रक्षा बंधन’ चित्रपट ट्विटरवर नेटिझन्सच्या रोषाचा सामना करत आहे. आमिर खानच्या लालसिंग चड्ढानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट रक्षाबंधन असा ट्रेंड सुरू झाला आहे. काय आहे याचे कारण चला जाणून घेऊ. 

अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची स्क्रिप्ट कनिका ढिल्लनने लिहिली आहे. लेखकाचे हिंदूफोबिक ट्विट समोर आल्यापासून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. लेखिकेचे अनेक ट्विट ज्यात तिने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे, ते अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही नेटकऱ्यांनी असाही दावा केला आहे की कनिकाने वारंवार हिंदू श्रद्धा आणि धार्मिक भावनांवर आघात केला आहे, त्यामुळे तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला पाहिजे.

इतकेच नाही तर अक्षयच्या जुन्या मुलाखतींच्या क्लिप आणि ट्विटसह नेटिझन्सचा एक भागही व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये अभिनेता महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहे आणि म्हणत या दिवशी दूध वाया घालवण्याऐवजी ते गरिबांना द्या असे आवाहन करताना दिसत आहे. अभिनेता अक्षय कुमारचे ट्विट, व्हिडिओ इंटरव्ह्यू आणि कनिका धिल्लनच्या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला असून नेटिझन्स रक्षाबंधनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत.

याबद्दल एका यूजरने लिहिले की, “या रक्षाबंधनाला अक्षय कुमारच्या आगामी चित्रपट “रक्षाबंधन” वर पैसे वाया घालवण्याऐवजी काही गरीब भावा आणि बहिणीला खायला द्या.तर आणखी एका युजरने बॉलीवूड चित्रपट पाहण्याऐवजी पैसे देऊन रक्षाबंधन साजरे करूया, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हा चित्रपट आता चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे.

हेही वाचा –

मी बॉलिवूडला परवडणार नाही म्हणणारा महेश बाबू करणार झळकणार ‘या’ हिंदी चित्रपटात, नेटकरी म्हणाले ‘आता…’

गेहना वशिष्ठच्या बोल्ड फोटोवर चाहते झाले फिदा पण भयानक कॅप्शनने वाढवली चिंता; म्हणतेय, ‘मला आता खूप…’

प्रेग्नेंसीमध्ये रणबीर घेतोय आलियाची ‘अशी’ काळजी; म्हणाली, ‘आता तो मला रात्री…’

Latest Post