Thursday, April 24, 2025
Home अन्य अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेही झाले कठीण

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचा लूक पाहून चाहते हैराण, ओळखणेही झाले कठीण

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने केवळ अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांमध्ये त्याच्या व्यक्तिरेखेत वेगवेगळे ​​प्रयोग करण्यास तो मागे पुढे पाहत नाही. लवकरच तो एका ग्लॅमरस ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. होय, नवाजुद्दीनच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नाव ”हड्डी” आहे आणि यासोबतच निर्मात्यांनी त्याचा फर्स्ट लुक देखील जाहीर केला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी लवकरच हद्दी चित्रपटात झळकणार आहे. ज्यामधील त्याचा लक्षवेधी लूक समोर आला आहे. नवाजुद्दीनचा ‘हड्डी’ लूक पाहून सगळेच थक्क झाले आहेत. त्यांची ओळख पटवणे खूप कठीण होत आहे.  मोशन पोस्टरमध्ये तो ग्लॅमरस केस आणि मेकअपसह ग्रे कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तसेच, त्याच्या हातात रक्त आहे. रक्ताने माखलेले शस्त्रही जवळच ठेवले आहे. हा चित्रपट एक रिव्हेंज ड्रामा आहे.

नवाजुद्दीनच्या या लूकवर सोशल मीडियावर लोकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक पाहून सर्वच चकित झाले आहेत. अनेक चाहत्यांनी याला ‘एपिक लूक’ म्हटले आहे. अनेकांना तो एका नजरेत अर्चना पूरण सिंगसारखा दिसतो.  सर्वजण नवाजुद्दीनच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा लूक पाहून चाहते ‘हड्डी’ चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, याबाबत अद्याप फारसा खुलासा झालेला नाही. सध्या त्याचे शूटिंग सुरू असून पुढच्या वर्षी रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. झी स्टुडिओ आणि आनंदिता स्टुडिओ संयुक्तपणे याची निर्मिती करत आहेत. अक्षत अजय शर्माने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

हेही वाचा –

वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा
सपना चौधरी विरोधात अटक वारंट जारी, पाहा काय आहे प्रकरण
आलिया भट्ट लग्नाआधी रणबीर कपूरसोबत एकाच खोलीत का राहू लागली, ‘हे’ कारण आले समोर

हे देखील वाचा