Saturday, April 20, 2024

सपना चौधरी विरोधात अटक वारंट जारी, पाहा काय आहे प्रकरण

प्रसिद्ध हरियाणवी डान्सप सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, लखनौच्या ACJM कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. नृत्याचा कार्यक्रम रद्द करणे आणि तिकीटाचे पैसे परत न करणे या चार वर्षे जुन्या प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली मात्र ती न्यायालयात हजर झाली नाही. त्यावर न्यायालयाने कठोर पाऊले उचलत अटक वॉरंट जारी केले आहे. 

सपनाविरुद्धचा हा खटला २०१८ सालचा आहे. 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपना चौधरीविरुद्ध आशियाना पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली होती. लखनऊच्या स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा नृत्याचा कार्यक्रम होणार होता, त्यासाठी हजारो तिकीटांचीही विक्री करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. सपना चौधरीलाही आगाऊ रक्कम देण्यात आली होती पण सिंगर कार्यक्रमाला हजर राहिली नाही, त्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला.

या कार्यक्रमासाठी सपनाने घेतलेले पैसेही आयोजकांना परत केले नसल्याचा आरोप करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी गायिका सपना चौधरीचा माफीचा अर्जही न्यायालयात देण्यात आला नाही, तर अन्य आरोपींच्या वतीने माफीचा अर्ज देण्यात आला होता.

याआधी न्यायालयाने हरियाणवी सिंगरच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली होती. न्यायालयाने प्रत्येकी 20,000 रुपयांच्या दोन जामीनावर आणि त्याच रकमेच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. आजकाल सपना चौधरीची एकापाठोपाठ एक गाणी रिलीज होत आहेत. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय असलेली सपना चौधरी इन्स्टाग्रामवर तिचे प्रत्येक गाणे आणि आगामी प्रोजेक्ट अपडेट करत असते.

हेही वाचा – सोनाली फोगाटचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, काही तासांपूर्वीच केली होती अखेरची पोस्ट
आलिया भट्ट लग्नाआधी रणबीर कपूरसोबत एकाच खोलीत का राहू लागली, ‘हे’ कारण आले समोर
कसला तो नाद! सलमानचा टॉवेल ते करिनाचा लेहंगा, आवडत्या कलाकाराच्या वस्तू घेण्यासाठी चाहत्यांनी ओतला पैसा

हे देखील वाचा