Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड फोटोत दिसणारा चिमुकला आहे सुपरस्टार, 2 अभिनेत्रींसोबत लग्न करून बनलाय 4 लेकरांचा बाप; ओळखलं का?

फोटोत दिसणारा चिमुकला आहे सुपरस्टार, 2 अभिनेत्रींसोबत लग्न करून बनलाय 4 लेकरांचा बाप; ओळखलं का?

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्यावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचे लहानपणीचे फोटोंचाही समावेश असतो. आताही एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो खूपच क्यूट दिसत आहे. त्याला या फोटोत ओळखणे त्याच्या चाहत्यांनाही कठीण होत आहे. चला तर कोण आहे तो अभिनेता जाणून घेऊया…

व्हायरल होत असलेल्या या फोटोत जो गोंडस मुलगा दिसत आहे, तो सध्या खूपच हँडसम आणि डॅशिंग दिसत आहे. त्याच्या लूक आणि स्माईलवर लाखो मुली फिदा होतात. विशेष म्हणजे, या अभिनेत्याची आई तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तसेच, त्याचे वडील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. याव्यतिरिक्त त्याच्या बहिणीनेदेखील अनेक सुपरहिट सिनेमात काम केले आहे.

दोन अभिनेत्रींसोबत केलंय लग्न
फोटोत दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात दोन दिग्गज अभिनेत्रींसोबत संसार थाटला आहे. मात्र, त्यातील एका अभिनेत्रीसोबत त्याचा घटस्फोट झाला आहे. तसेच, त्याची दुसरी पत्नी अभिनयासोबतच तिच्या सुंदरतेसाठीही ओळखली जाते. इतकेच नाही, तर त्याची मुलगी सध्या बॉलिवूड अभिनेत्री बनली आहे, जी तिच्या सिनेमासोबतच तिच्या सुंदरतेसाठीही ओळखली जाते.

Saif-Ali-Khan

कोण आहे फोटोतील अभिनेता?
इतके वर्णन केल्यानंतर हा अभिनेता कोण आहे, याचा अंदाज येतो. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, तो इतर कुणी नसून सुपरस्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) आहे. त्याने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यात ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘बंटी और बबली’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘आरक्षण’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

आगामी सिनेमे
सैफ अली खान याच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हादेखील मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्या या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…पण कधीही हिम्मत नाही झाली’, हेमांगी कवीने सांगितला ताज हॉटेलमधील तिचा भन्नाट अनुभव
लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर झालेल्या बिपाशाने शेअर केला व्हिडिओ, एक्सेप्रेशन्स देत दाखवला बेबी बंप
मलायका आणि अरबाजच्या लग्नात अर्जुन कपूर होता १३ वर्षाचा, फोटो पाहिला का?

हे देखील वाचा