मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, बॉलिवूड बॉयकॉट होय. अनेक कलाकारांनी यावर आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आता यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेदेखील उडी घेतली आहे. अभिनेत्री स्वराने सांगितलं की, सिनेमे न चालण्यामागे बॉयकॉट ट्रेंड नाहीये. तिने आलिया भट्ट हिचे उदाहरण देऊन ही गोष्ट स्पष्ट केली.
अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) म्हणाली की, सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला खूप बॉयकॉट केले. मात्र, तरीही तिचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा लोकांनी आवडीने पाहिला. स्वराने हेही सांगितले की, ‘काही तिरस्कार करणारे लोकच बॉयकॉट ट्रेंडचा प्रसार करत आहेत. कदाचित ते यातून कमाईदेखील करत आहेत.’
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतायेत सिनेमे
कोरोना व्हायरसनंतर मोजक्याच सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. यामागे नेटकरी वेगवेगळ्या कारणांना जबाबदार ठरवत आहेत. अनेकांनी तर असेही म्हटले आहे की, प्रेक्षकांच्या नजरेत बॉलिवूड कलाकारांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या सिनेमाच्या कमाईवर होत आहे. मागील दोन वर्षांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड आणि अनेक अभिनेत्यांसाठी बॉयकॉट ट्रेंड दरदिवशी पाहायला मिळत आहे. अशात स्वराने सिनेमाच्या बॉयकॉट होण्यावर तिचे मत मांडले आहे.
काय म्हणाली स्वरा?
अभिनेत्री स्वरा भास्कर हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मला माहिती नाही की, बॉयकॉट ट्रेंड हा वास्तवात कमाईवर किती परिणाम करत आहे. सुशांत सिंग राजपूत याच्या दु:खद निधनानंतर आलिया भट्ट हिच्याविरुद्ध सोशल मीडियावर खूप नकारात्मकता पसरवली गेली. हे चुकीचेच होते. त्यावेळी ‘सडक 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला बॉयकॉट आणि नकारात्मक प्रसिद्धी करण्यात आली. सिनेमा पडला.”
‘लोक करतायेत कमाई’
पुढे बोलताना स्वरा म्हणाली की, “जेव्हा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हाही हेच घडलं. नेपोटिझम, सुशांत, त्याच त्या बॉयकॉटच्या घोषणा, परंतु लोक चित्रपटगृहात गेले आणि त्यांनी सिनेमे पाहिले. बॉयकॉटला जास्तच महत्त्व दिले गेले आहे. हा छोट्याशा लोकांचा ग्रूप आहे. त्यांचा खास अजेंडा आहे. ते लोक द्वेष पसरवणारे आहेत, बॉलिवूडचा द्वेष करतात, बॉलिवूडला बर्बाद करू इच्छितात. ते बॉलिवूडबद्दल खोटी माहिती पसरवतात. मला वाटते की, त्यांचीही कमाई होत आहे. अनेकांनी सुशांतच्या घटनेवरून आपला फायदा करून घेतला.”
स्वराने मांडलेल्या या परखड मतानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. याव्यतिरिक्त स्वराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘जहा चार यार’ या सिनेमात झळकली होती. आता तिच्या खात्यात ‘मँगो’ हा सिनेमा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…’
दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
लग्नानंतर दोन वर्षातच कोर्टात पोहोचली लवस्टोरी, लोकप्रिय अभिनेत्रीची पतीविरोधात तक्रार दाखल