Sunday, July 14, 2024

लग्नानंतर दोन वर्षातच कोर्टात पोहोचली लवस्टोरी, लोकप्रिय अभिनेत्रीची पतीविरोधात तक्रार दाखल

दोन वर्षांपुर्वी आपल्या मित्रासोबत लग्न करुन चर्चेत आलेली अभिनेत्री प्राची तेहलानने आता थेट पतिविरोधातच कोर्टात धाव घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्राचीने आपल्या पतीची दिल्ली पोलिसांंमध्ये तक्रार दाखल करताना एक व्हिडिओही सादर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा पती रोहित सरोदा एक अवैध्य शस्त्र चालवताना दिसत आहे. ही तक्रार करत अभिनेत्री चांगलीच घाबरली असल्याचे तिच्या मैत्रिणींने सांगितले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चल जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की अभिनेत्री प्राचीने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा पती फायरिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एकूण चारवेळा फायर केल्याचेही दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्या हातात शॉर्टगनही दिसत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या अभिनेत्रीने रितसर याबद्दल पोलिसांत तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

अभिनेत्रीच्या या  व्हायरल पोस्टनंतर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. तिच्या या पोस्टवर खुलासा करताना एका पत्रकाराने हा व्हिडिओ दिल्लीमधील एका पार्कमधला असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर व्हिडिओमध्ये फायरिंग करणारी व्यक्ती अभिनेत्रीचा पती असल्याचाही खुलासा केला आहे. पतीविरोधातच तक्रार दाखल केल्यामुळे त्यांचा दोन वर्षाचा सुखी संसार मोडण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान प्राचीच्या अभिनय कारकिर्दिबद्दल बोलायचे झाल्यास तिने दिया और बाती हम या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर एंट्री करत अनेक तेलुगू तसेच मल्याळम चित्रपटामध्ये काम केले. प्राची आणि रोहितचा कोरोना काळात विवाह झाला होता.

हेही वाचा – व्हायरल फोटोमुळे शेफाली वैद्य यांची सई ताम्हणकरवर जोरदार टिका; म्हणाल्या, ‘कोणती हिंदू स्त्री…
लग्नानंतर १५ दिवसातच सॅम बॉंबेला खायला लागली होती जेलची हवा, पत्नी पूनम पांडेने केले होता हा गंभीर आरोप
कहानी घर घर की’मधून करिअरची सुरुवात, ‘या’ शोने बदलले आमिर अली मलिकचे आयुष्य

हे देखील वाचा