बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना ऑफर झालेले रोल त्यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे नाकारले. काहीवेळा त्यांचा हा निर्णय योग्य ठरला, तर काहीवेळा त्यांना या निर्णयाचा पश्चातापही करावा लागला. या कलाकारांमध्ये अभिनेत्री क्रिती सेनन हिच्या नावाचाही समावेश आहे. क्रिती आणि अभिनेता टायगर श्रॉफ नुकतेच ‘कॉफी विथ करण‘ या शोमध्ये पोहोचले होते. यावेळी दोघांनीही त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच त्यांच्या अशा काही गुपीतांचाही उलगडा झाला, जे फक्त त्यांनाच माहिती होते. क्रितीने तिच्या एका रोलबद्दल खुलासा केलाय.
सन 2018मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मात्र, तुम्हाला माहितीये का? की या सिनेमात कियारा आडवाणी (Kiara Advani) हिने साकारलेला रोल हा अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिला ऑफर करण्यात आला होता. याचा खुलासा क्रितीने केला आहे. तसेच, तिने हेही सांगितले की, तिला हा रोल जेव्हा ऑफर झाला होता, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती. तसेच, तिने हा रोल का नाकारला होता?
View this post on Instagram
‘हिरोपंती’ सिनेमातून केली कारकीर्दीची सुरुवात
सन 2014मध्ये क्रिती सेनन हिने बॉलिवूड पदार्पण केले होते. तिने टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यासोबत ‘हिरोपंती’ (Heropanti) या सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘राबता’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हाऊसफुल 4’ आणि ‘पानीपत’ यांसारख्या सिनेमातही काम केले. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. मात्र, सन 2018मध्ये तिला ‘लस्ट स्टोरीज’ हा सिनेमा ऑफर झाला होता. यामध्ये 4 वेगवेगळ्या कहाण्या दाखवण्यात आल्या होत्या. प्रत्येक कहाणीचा दिग्दर्शक वेगळा होता. या सिनेमात क्रितीला कियाराचा रोल ऑफर झाला होता. मात्र, जेव्हा तिने या रोलबद्दल ऐकले, तेव्हा ती याबद्दल जराशी चिंतेत पडली होती. त्यानंतर तिने हा रोल नाकारला होता.
आईमुळे नाकारला रोल
‘कॉफी विथ करण’मध्ये क्रितीने सांगितले की, आजही ती कोणताही इंटीमेट सीन करते, तेव्हा आधी आईशी चर्चा करते. अशात जेव्हा ‘लस्ट स्टोरीज’ सिनेमा तिला ऑफर झाला, तेव्हा तिला माहिती होते की, तिची आई कदाचित या रोलसाठी होकार देणार नाही. त्यामुळे तिने आईला न विचारताच या रोलला स्वत:च नकार कळवला होता. त्यानंतर हा रोल कियारा आडवाणी हिला ऑफर झाला होता. आजही हा रोल कियाराच्या सर्वोत्तम अभिनयांमध्ये गणला जातो.
क्रितीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘हिरोपंती 2’ या सिनेमात झळकली होती. आता तिच्या खात्यात ‘भेडिया’, ‘गणपत’, ‘आदिपुरुष’, ‘शहजादा’ आणि ‘हाऊसफुल 5’ असे एकूण 5 सिनेमे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘द काश्मीर फाईल्स’च्या दिग्दर्शकाने थेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच साधला निशाणा; म्हणाले…
कोणी चित्रकार तर कोणी बुद्धिबळपटू, बॉलिवूड कलाकार खेळांमध्येही आहेत आघाडीवर
मुकेश अंबानींच्या गणपती विसर्जनाला पोहचले रणवीर- दीपिका, डान्स पाहून सारेच हैराण