Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड ‘कार्तिकेय 2’ ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, एकूण इतक्या कोटींचा जमवला गल्ला

‘कार्तिकेय 2’ ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, एकूण इतक्या कोटींचा जमवला गल्ला

दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थचा (Nikhil Siddhartha) ‘कार्तिकेय 2‘ (Karthikeya 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या तीन आठवड्यानंतरदेखील हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. ‘कार्तिकेय 2’ हा या वर्षातला सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमा ठरला आहे.

तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार,’कार्तिकेय 2’च्या हिंदी वर्जनने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 6.94 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 54 लाखांचा गल्ला जमवला होता.

‘कार्तिकेय 2’च्या कबाईबद्दल जाणून घ्या…
‘कार्तिकेय 2’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या आठवड्यात सिनेमागृहात आपली जादू दाखवण्यात कमी पडला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 13.14 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 6.94 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 26.23 कोटींचा गल्ला जमवला आहे.

 

View this post on Instagram

 

‘कार्तिकेय 2’ या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळत आहे. ‘कार्तिकेय 2’ हा 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘कार्तिकेय’ सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमात निखिल सिद्धार्थ (Nikhil Siddharth) आणि अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन (Anupama Parameshwaran) मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांसह अनुपम खेर (Anupam Kher), विवा हर्षा (Viva Harsha) आणि आदित्य (Adithya) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चंदू मोंदेती (Chandoo Mondeti) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

द्वारका नगरीतील अनेक रहस्यांचा होणार उलगडा
‘कार्तिकेय 2’ या सिनेमाचे कथानक आणि दिग्दर्सन चंदू मोंडेती यांनी केलं आहे. तर या सिनेमाच्या प्रोडक्शनची धुरा विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवालने सांभाळली आहे. कार्तिक घट्टामनेनीने कोरियोग्राफीची केली आहे. या सिनेमात द्वारका नगरीतील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘जक्कल’ मराठी बेवसिरीज, पुण्यातील भीषण हत्याकांडाचा होणार उलघडा
डुप्लिकेट ऐश्वर्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
अखेर चाहत्यासमोर झुकला जुनिअर एन टीआर, भरसभेत ‘या’ कारणामुळे मागितली माफी

हे देखील वाचा