×

निर्मात्यांनी पैसे वाढवल्यावर अनुपमा परमेश्वरन दिला होता आशिष रेड्डीसोबत किसिंग सीन करण्यास होकार

अनुपमा परमेश्वरन आणि आशिष रेड्डी अभिनित ‘राऊडी बॉईज पोंगल’ प्रदर्शित झाला आहे. जो चित्रपटगृहात प्रीमियर झाल्यापासून दररोज प्रेक्षकांची मने जिंकत आहे. विशेष म्हणजे या ‘प्रेमम’ फेम अभिनेत्रीने चित्रपटात पहिल्यांदाच तिच्या सहकलाकाराला पडद्यावर किस केले आहे. ‘राउडी बॉईज’च्या ट्रेलरने अभिनेत्रीच्या चाहत्यांची उत्सुकता आधीच वाढवली होती आणि तिने या चित्रपटात तिची स्टाईल सादर केली आहे. चला तर मग अनुपमाने पडद्यावर किसिंग सीन करण्यास होकार कसा दिला याची माहिती जाणून घेऊया.

पडद्यावर बोल्ड सीन करण्यासाठी अनुपमाला मिळाली ‘इतकी’ फी

पडद्यावर पदार्पण केलेल्या आशिष रेड्डीसोबत अनुपमाने चित्रपटात अनेकवेळा लिप-सीन करताना दिसली. रुपेरी पडद्यावर या जोडप्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसली असून, हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अनुपमाला या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करण्यासाठी ५० लाख रुपये देण्यात आले होते. असेही बोलले जात आहे की, अभिनेत्री केवळ बोल्ड सीनसाठी जास्त रक्कम घेत आहे. ‘राऊडी बॉईज’च्या आधी तिने फक्त फॅमिली ओरिएंटेड चित्रपट केले होते.

अनुपमाला पहिल्यांदा चुंबन घेता आले नाही

माध्यमांतील वृतांमध्ये असे सांगितले जात आहे की, अनुपमाला सुरुवातीला बोल्ड सीन करताना अस्वस्थ वाटत होते. पण जेव्हा निर्मात्यांनी तिला भरघोस रक्कम देण्याचे आश्वासन दिले तेव्हा तिने लिपलॉक करण्यास होकार दिला. चित्रपट पाहिल्यानंतर काही चाहत्यांना अनुपमाची ही स्टाईल आवडली, तर काहीजण मनोरंजन म्हणून त्याचा आनंद घेत आहेत.

‘राउडी बॉईज’मध्येही ‘या’ कलाकारांची होती महत्त्वाची भूमिका

‘राउडी बॉईज’चा मुख्य अभिनेता आशिष रेड्डी हा निर्माता दिल राजूचा पुतण्या आहे आणि त्याचे दिग्दर्शन हर्ष कोनुकोंडी यांनी केले आहे. याची निर्मिती शिरीष आणि दिल राजू यांनी मिळून केली आहे. अनुपमा आणि आशिष व्यतिरिक्त चित्रपटात कार्तिक रत्नम, सहदेव विक्रम, तेज कुरापती आणि कोमाली प्रसाद यांसारखे इतर अनेक प्रमुख पात्र कलाकार देखील आहेत. देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटासाठी संगीत दिले आहे, ज्याची गाणी पुष्पा यांनी संगीतबद्ध केली आहेत.

हेही वाचा :

Latest Post