हिंदी सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यातील पात्र प्रेक्षक अजूनही विसरू शकले नाही. त्यातीलच एक म्हणजे ‘हेरा फेरी’ हा चित्रपट होय. या चित्रपटातील ‘राजू’-‘शाम’ असाे किंवा ‘बाबुराव’, नाव घेताच चाहते हसायला लागतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने चांगलाच धुमाकूळ घातला हाेता. त्यामुळे प्रेक्षक ‘हेरा फेरी’ चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ’हेरा फेरी 3’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
’हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) या चित्रपटाबाबत माेठी माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, फिरोज नाडियाडवाला यांनी अखेर सिनेमाच्या तिसऱ्या भागावर काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी ते निर्माते आनंद पंडित यांच्यासोबत काम करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज आणि आनंद ‘हेरा फेरी’ भाग तीन बनवण्यासाठी कमर्शियल दिग्दर्शकांसाेबत चर्चा करत आहेत. येणाऱ्या महिन्यात चित्रपटाबाबत अधिकृत घाेषणी केली जाईल. माध्यमांतील वृत्तांनुसार, 9 सप्टेंबरला अक्षय कुमार याच्या वाढदिवसानिमित्य ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाची घोषणा करण्याची याेजणा हाेती. आता ते शक्य आहे, कारण आता चित्रपटाशी निगडीत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
Hey cenema lovers here a good news for us Hera Pheri 3 is coming ????
— ???? AADESH JAADHAV ???? (@MaraathiManus) September 3, 2022
आपले सर्व कर्ज फेडल्यानंतर फिराेज (Firoz Nadiadwala) ‘हेरा फेरी 3’ वरच नव्हे, तर अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांचा ‘वेलकम 3’ (Welcome 3) हा चित्रपट बनविण्याच्याही विचारात आहेत. अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांनी मजनू आणि उदय यांची भूमिका साकारत प्रेक्षकांना पाेट धरून हसायला भाग पाडले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-हॉलिवूड अभिनेता चॅडविक बोसमनला निधनाच्या दोन वर्षानंतर मिळाला पुरस्कार, मार्वल स्टुडिओने केली घोषणा
‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित
या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म