Sunday, July 14, 2024

अक्षय कुमार आणि कपिल शर्माचे बिनसले? म्हणाला, ‘तू नजर लावल्याने सिनेमे फ्लॉप होतायेत’

सुपरस्टार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील कदाचित एकमेव अभिनेता असावा, जो वर्षाकाठी 5 ते 6 सिनेमात काम करतो. त्यामुळे तो बॉलिवूडच्या सर्वाधिक व्यस्त अभिनेत्यांमध्ये गणला जातो. तो त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतो. तो छोट्या पडद्यावरील अनेक शोमध्ये सहभागी होत असतो. त्यापैकीच एक म्हणजे, ‘द कपिल शर्मा शो‘ होय. कपिल शर्मा त्याच्या या शोचे नवीन पर्व प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, त्यामुळे अक्षय शोच्या पहिल्या वीकेंडमध्ये शोभा वाढवताना दिसेल.

या शोच्या निर्मात्यांनी एक प्रोमो शेअर केला होता. त्यात त्यांनी खुलासा केला होता की, अक्षय कुमार (Akshay Kumar) हा अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) हिच्यासोबत त्याच्या आगामी ‘कठपुतली’ (Cuttputlli) सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे.

अक्षय आणि रकुल यांच्यापासून प्रोमोची सुरुवात होते. दुसरीकडे, कपिल स्टेजवर जोक मारताना दिसत आहे. कपिल म्हणतो की, “पाजी तुम्ही प्रत्येक वाढदिवशी एक वर्षे लहान कसे काय होता?” यावर अक्षय कुमार हसतो. तसेच, तो कपिलवर आरोप लावतो की, त्याच्यामुळेच त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत.

अक्षय कुमार म्हणतो की, “हा माणूस इतकी नजर लावतो. माझ्या चित्रपटांवर, पैशांवर, सर्व गोष्टींवर नजर लावली आहे. आता कोणताही चित्रपट चालत नाहीये.”

यावर्षी अक्षय कुमारचे 3 सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. यापैकी एकाही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली नाहीये. ‘रक्षाबंधन’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 44 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच, ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमाने 68 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसरीकडे, ‘बच्चन पांडे’ या सिनेमाने जवळपास 50 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर आता ‘कठपुतली’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाला ओटीटीवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित
या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म
स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा त्यांचा किस्सा

हे देखील वाचा