Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड पाकिस्तानकडून पराभवानंतर उर्वशी रौतेला झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘आली पनवती…’

पाकिस्तानकडून पराभवानंतर उर्वशी रौतेला झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘आली पनवती…’

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला(Urvashi Rautela) तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्वशीनं एकदा  मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ती क्रिकेट मॅच अजिबात बघत नाही. ती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीशिवाय कोणत्याही क्रिकेटपटूला ओळखत नाही. पण आता उर्वशीने क्रिकेट मॅच बघायला सुरुवात केली आहे. या कारणामुळे उर्वशीला सध्या ट्रोल केलं जात आहे. 

उर्वशी रौतेला ही ऋषभ पंतची (Rishabh Pant)एक्स गर्लफ्रेंड असल्याचे नेहमीच बोलले जाते. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचेही अनेकदा बोलले गेले होते. 28 ऑगस्ट रोजी उर्वशी ही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. तेव्हा उर्वशीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा उर्वशी काल झालेला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईच्या ‘दुबई इंटरनॅशनल स्टेडियम’ मध्ये गेली होती.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत देशवासीयांमध्ये प्रचंड क्रेझ असून, चुकूनही टीम इंडिया हरली, तर चाहते दुसऱ्यावर राग काळतात. यावेळीही लोकांनी आपला राग बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलावर काढला.

क्रिकेटच्या मैदानात अवघ्या 14 धावा करून ऋषभ आऊट होताच सोशल मीडियावर उर्वशीवर ट्रोलिंगला सुरुवात झाली. ऋषभच्या खराब कामगिरीसाठी लोक उर्वशीला दोष देऊ लागले. त्याच्याबद्दल सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करू लागले.

ऋषभ बाद होताच उर्वशी निशाण्यावर आली
उर्वशीने स्टेडियममधील एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर एका यूजरने लिहिले की, “दीदी, तुमच्या कारकिर्दीत काही विशेष झाले नाही, गरीब ऋषभ पंतला नीट खेळू द्या.” तर दुसऱ्याने ट्विट केले की, “ऋषभ पंत बाद झाल्यानंतर सर्वात आनंदी व्यक्ती.” व्हिडिओमध्ये उर्वशी खूप आनंदी दिसत होती. एका ट्विटर यूजरने तर उर्वशीला ऋषभसाठी ‘पनौती’ म्हटले आहे. ट्विट करून लिहिले की, “पुनौती पंतला आऊट करायला आली होती.” काही लोकांनी उर्वशीकडे बोट दाखवत असेही म्हटले की, तिला सामना पाहण्यासाठी कोण बोलावते तर काहींनी उर्वशीला ऋषभला माफ करा असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

 ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात वाद सुरू आहे
ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला तेव्हा चर्चेत आले जेव्हा उर्वशीने नाव न घेता एका मुलाखतीत सांगितले की, ऋषभ तासनतास हॉटेलच्या लॉबीमध्ये त्यांची वाट पाहत होता आणि त्यांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होता. 16-17 वेळा फोनही केला होता. यावर ऋषभने सोशल मीडियावर उर्वशीवर टीका करत म्हटले की, लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक किती खोटे बोलतात. यानंतर दोघांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. उर्वशीने तर ऋषभला ‘छोटू भैया’ म्हणत खोटे बोलल्याच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
विजय देवरकोंडा ते असीन, चित्रपटांत शिक्षकाच्या भूमिकेत गाजले ‘हे’ साऊथ कलाकार
‘मिल्क’ नावाने प्रसिद्ध असलेली तमन्ना बनली बॉक्सर, ‘हे’ चित्रपट ठरले सुपरफ्लॉप
बराक ओबामा यांचा सन्मान, ‘या’ सिरीजला स्वतःचा आवाज देऊन पटकावला एमी अवॉर्ड

हे देखील वाचा