Friday, April 26, 2024

‘बदनाम व्हायला मी मुन्नी आहे का?’ उर्वशी रौतेला रिषभ पंतचा सोशल मीडियावर रंगला वाद

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटर्स यांच्यातील अफेअरच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. सिने जगतातील अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटर्समध्ये अफेअर आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या अफेअरच्या बातम्या खूप आधीपासून येऊ लागल्या होत्या. मात्र, दोघांनीही या प्रकरणावर काहीही सांगितले नाही. सध्या उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू आहे. मात्र, या दोघांनीही एकमेकांचे नाव घेतलेले नाही. वास्तविक, ऋषभ पंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि नंतर ती हटवली. यानंतर उर्वशी रौतेलानेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर ही दोन्ही नावे सातत्याने चर्चेत आहेत.

ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर अलिकडेच ‘लोकप्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि बातम्यांमध्ये राहण्यासाठी मुलाखतींमध्ये कसे खोटे बोलतात हे खूप मजेदार आहे. काही लोक नाव आणि लोकप्रियतेसाठी किती तहानलेले आहेत हे वाईट आहे. देवा त्यांना आशीर्वाद दे. माझ्या बहिणीचा पाठलाग सोडा, खोट्यालाही एक मर्यादा असते.’ अशी पोस्ट केली होती.

ऋषभ पंतची ही पोस्ट उर्वशी रौतेलाची जुनी मुलाखत व्हायरल झाल्यानंतर आली आहे. या मुलाखतीत तिने सांगितले होते की आरपी तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास थांबले होता. पण ती भेटू शकली नाही. ऋषभ पंतच्या या कथेनंतर उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘छोटू भैय्याने बॅट बॉल खेळावा. मी काही मुन्नी नाही तुझ्यासाठी बदनाम व्हायला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. ‘आरपी छोटू भैया’ असा हॅशटॅग दिला आहे. तिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला सतत सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

हेही वाचा –

 धर्मेंद्र – मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा पतीला लागला होता सुगावा, थेट तोंडाला काळे फासून घेतला बदला

‘भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे’, ट्रोलिंंगनंतर गायक राहुल देशपांडेंनी टिकाकारांना दिले चोख उत्तर

अजय आणि युग या बाप-लेकामधील झक्कास नातं व्हिडिओतून आलं समोर, चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा