छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती 14‘ हा प्रसिद्ध शो प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या शोचे सूत्रसंचालन ‘महानायक’ अमिताभ बच्चन हे करत आहेत. हा चाहत्यांचा आवडीचा शो आहे. या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सेलिब्रेटी पाहुणी स्पर्धक आणि वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीन पोहोचली. तिला पाहताच अमिताभ यांना दिग्गज बॉक्सर मोहम्मद अली यांची आठवण आली. त्यांनी यावेळी सांगितले की, त्यांना भेटल्यानंतर काय-काय घडले होते. चला तर जाणून घेऊया…
झाले असे की, ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) या शोमध्ये आलेल्या निखत जरीन (Nikhat Jarin) हिने सांगितले की, मोहम्मद अली (Muhammad Ali) हे तिचे आवडते बॉक्सर आहेत. ती त्यांचे सिग्नेचर मूव्ह्जही फॉलो करते. तेवढ्यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितले की, बॉक्सर हे त्यांना प्रेरणा देतात. त्यांची भेट जेव्हा मोहम्मद अली यांच्याशी झाली होती, तेव्हा काय झाले होते हे अमिताभ यांनी सांगितले. ते म्हणाले की, “मी त्यांना त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी भेटलो होतो. प्रकाश मेहरा यांना त्यांच्यावर चित्रपट बनवायचा होता आणि त्यासाठी आम्ही त्यांना त्यांच्याच घरी भेटलो होतो. मात्र, तो चित्रपट कधीच बनला नाही. मात्र, मला शेवटी एक बुक्की खायला मिळाली. माझ्याकडे त्यांच्यासोबतचा फोटोही आहे, ज्यात ते माझ्या चेहऱ्यावर बुक्की मारताना पोझ देत आहेत. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत.”
मोहम्मद अलीचे चाहते होते अमिताभ बच्चन
सन 2016 मध्ये मोहम्मद अली यांचे निधन झाले होते. त्यावेळी अमिताभ यांनी त्यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटोही शेअर केला होता. त्या फोटोसोबत त्यांनी लिहिले होते की, “महान मोहम्मद अली यांच्यासोबत त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी. खूप मजा आली. माझ्यासाठी ही सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे.” एका मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितले होते की, 1979मध्ये ते त्यांच्या घरी गेले होते. ते खूप शांत, मातीशी जोडलेले आणि आनंदी व्यक्ती होती. त्यांची कामगिरी आख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. प्रकाश मेहरा यांना जो सिनेमा बनवायचा होता, त्यात मला ते मोहम्मद अली यांचा रोल देणार होते. मात्र, तो सिनेमा कधीच बनला नाही. असे असले, तरी मी त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मला नेहमी आठवत राहतील.”
View this post on Instagram
निखत जरीनने मोहम्मद अलींना म्हटले प्रेरणादायी
अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, त्यांच्यासोबत वर्णद्वेषी भेदभाव होत होता. याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी नदीत आपले सुवर्णपदक फेकले होते. एपिसोडमध्ये निखत जरीन हिने सांगितले की, तिने माईक टायसन आणि मोहम्मद अली यांना पाहून बॉक्सिंगचे धडे गिरवले होते. ती म्हणाली, “जेव्हा मी त्यांचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली, तेव्हा मला त्यांच्या खेळण्याची पद्धत खूप आवडली त्यांनी मला खूप प्रेरणा दिली आहे.”
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर ते ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या सिनेमात रणबीर कपूर, आलिया भट्ट या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लायगर’ने उठवला विजयचा बाजार! आगामी सिनेमा सुरू होण्यापूर्वीच पडला बंद; स्वखर्चातून करणार नुकसानभरपाई
अर्शदीपच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आयुषमान खुराना; म्हणाला,’देवासाठीतरी…’
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’