Friday, March 29, 2024

अमिताभ बच्चन यांची नात नव्याला डेट करतोय सिद्धांत चतुर्वेदी? पहिल्यांदाच केला खुलासा

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा(Navya Naveli Nanda) हिचे व्यक्तिमत्व सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर यांसारख्या स्टार किड्सपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. शो-ऑफवर करायला तिला जास्त आवडत नाही आणि या तरुण वयात तिला सामाजिक कार्यात रस आहे. महिला सक्षमीकरणाबाबत तिचा स्वतःचा एक प्रकल्पही आहे. तिला अभिनयात करिअर करायचे नाही, तर वडिलांचा व्यवसाय पुढे न्यायचा आहे, असेही तिने स्पष्ट केले आहे.

या सगळ्यात नवीन तिच्या एका नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. ती आणि ‘गहराइयां’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी(Siddhant chaturvedi) एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, आता अशा चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सिद्धांत लवकरच करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो त्याच्या आगामी ‘फोन बूथ’ चित्रपटातील सहकलाकार ईशान खट्टर आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

अभिनेता म्हणाला, मी पूर्णपणे सिंगल आहे
एपिसोडचे प्रोमो समोर आले आहेत. यामध्ये करण सिद्धांतला त्याच्या लव लाइफबद्दल विचारताना दिसत आहे, ज्यावर तो स्पष्टपणे म्हणतो, “मी एकदम सिंगल आहे.” यासोबतच तो हे देखील सांगतो की, इशान देखील सिंगल क्लबमध्ये सामील झाला आहे. तो म्हणतो, “माझ्यासोबत फिरताना तो पण सिंगल झाला.”

याआधी, करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीतील नव्या नवेली नंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघे एकत्र नाचताना दिसले होते. दोघेही एकत्र पार्टीत पोहोचले नाहीत, मात्र तिथे भरपूर क्वालिटी टाइम घालवताना दिसले. यामुळे त्यांच्या डेटींगच्या अटकळांना आणखी उधाण आले. दुसरीकडे, इशान खट्टरबद्दल बोलताना तो अनन्या पांडेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या लूकवर भडकले चाहते; म्हणाले ‘सर्जरीने चेहऱ्याची वाट लावली…’
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘गुडबाय’चा मजेदार प्रमोशनल व्हिडिओ, शूट करायला लागले तब्बल 25 तास
वेबसिरीजमधून होणार राजीव गांधी हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा, ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाने घेतली जबाबदारी

हे देखील वाचा