Monday, August 4, 2025
Home अन्य प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या अचानक बेपत्ता, आईने व्हिडिओ शेअर करून केले ‘हे’ आवाहन

प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या अचानक बेपत्ता, आईने व्हिडिओ शेअर करून केले ‘हे’ आवाहन

आजकाल सोशल मीडिया (Social media) हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येकाच्या कलेला वाव मिळतो आणि अनेक सामान्य लोकही प्रसिद्धीच्या झोतात येतात. यातीलच एक म्हणजे बिंदास काव्या. बिंदास काव्याचे युट्युब वर 4.32 मिलियन एवढे सबस्क्राईब आहेत. सोशल मीडियावर तिचा खूप चांगला फॅन फॉलोविंग आहे

अशातच काव्याबाबत एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. ती म्हणजे कालपासून म्हणजेच दिनांक 9 सप्टेंबरपासून ती गायब झाल्याची घटना समोर आली आहे. ती गायब झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी शेजारच्या पोलीस चौकीमध्ये तिची कंप्लेंट केली. तरीदेखील पोलिसांना ती सापडली नाही. आता त्या मुलीचा जबरदस्त शोध सुरू आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavya Yadav♥️ (@bindass_kavya)

ती हरवल्यानंतर तिच्या कुटुंबीयांची काळजी वाढत चालली आहे. मुलीच्या आईने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने सांगितले की, “आमची मुलगी एकटी राहते पण इतका वेळ कोणाशी संपर्क नसता ती एकटी राहू शकत नाही त्यामुळे सगळ्यांना आवाहन आहे की ज्यांना कोणाला आमची मुलगी दिसल त्यांनी तातडीने आम्हाला कळवा.” काव्या ही मूळची औरंगाबाद येथील रहिवाशी आहे. तिथूनच तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. परंतु हळूहळू तिला यश मिळाल्याने ती दुसऱ्या ठिकाणी राहत होती. अशातच तिच्याबाबत ही घटना घडली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री हुमा कुरेशीने अनुराग कश्यपसोबतच्या पहिल्या भेटीचा केला खुलासा; म्हणाली, ‘तो मला थेट…’
खेसारी लाल यादवच्या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, संभावना सेठच्या डान्समूव्हने जिंकले चाहत्यांचे मन
गायक जुबीन नौटियालवर नेटकऱ्यांचा संताप; थेट अटकेची केली मागणी, काय घडलं नेमकं ?

हे देखील वाचा