खेसारी लाल यादवच्या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, संभावना सेठच्या डान्समूव्हने जिंकले चाहत्यांचे मन

0
93

खेसारीलाल यादव आणि संभावना सेठ यांची दमदार जोडी जेव्हा-जेव्हा रुपेरी पडद्यावर दिसली तेव्हा – तेव्हा समोर बसलेले प्रेक्षक शिट्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. आजकाल खेसारी लाल यादव यांच्या ‘बाप जी’ चित्रपटातील संभावना सेठचे एक आयटम साँग खूप व्हायरल होत आहे.

‘बाप जी’ चित्रपटातील या गाण्यावर संभावना सेठ (Sambhavna Seth) हजारो प्रेक्षकांसमोर तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) यांच्यासह संभावना सेठ यांनीही आपल्या सेक्सी मूव्ह्सने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. खेसारी लाल यादव यांचे हे गाणे आदल्याच दिवशी वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीवर रिलीज झाले आहे आणि याआधी हा चित्रपट थिएटरमध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता.

छोट्या पडद्यावरून भोजपुरी सिनेमांपर्यंत, आपल्या किलर परफॉर्मन्सने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री संभावना सेठने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.संभावनाने करीअरच्या सुरुवात एक माॅडेल म्हणुन केली. त्यानंतर तिने ‘पागलपन’ या चित्रपटातुन सिनेसृष्टीत पदार्पन केले. यादरम्याण तिने वेलकम बेक या चित्रपटात आयटम साॅंग केलं हाेतं. तर 2008 साली सलमाल खानचा प्रसिद्ध शाे ‘बिग बाॅस सीझन 8’ मध्ये दिसली हाेती. सेठने आतापर्यंत 50 हुन अधिक बाॅलिवूड आणि भाेजपुरी गाण्यात दिसली आहे. यासोबतच भावना भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक चांगली अभिनेत्री म्हणूनही उदयास आली आहे.

संभावना सेठचे हे गाणे खेसारी लाल यादव, ओम झा आणि खुशबू तिवारी यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल यादव राज यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीत ओम झा यांनी दिले आहे. खेसारी लाल यादव आणि संभावना सेठ यांच्याशिवाय रितू सिंग, काजल राघवानी, मनोज टायगर या प्रसिद्ध कलाकारांनीही या चित्रपटात आपली छाप सोडली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
तेजस्वीने शेअर केले आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटो, पाहून झोपच उडेल

गायक राहुल जैनच्या अडचणी वाढल्या, बला’त्कार प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
उर्फी जावेदने अखेर ‘त्या’ पोरीला शोधलंच! टॅलेट पाहून तुमच्याही होतील बत्त्या गुल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here