अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार फिटनेस आणि निरोगी शरीर राखण्यासाठी उत्साही असतात. मिलिंद जगभरातील मॅरेथॉनमध्ये जाताे, भरपूर व्यायाम करताे, पौष्टिक अन्न खाताे आणि निराेगी शरीर ठेवण्याव्यतिरिक्त मानसिक आरोग्यावरही लक्ष देताे. इतकंच नाही, तर ताे त्याच्या चाहत्यांना देखील या टिप्स पाळण्याची विनंती करताे. फिटनेस व्यतिरिक्त ते दाेघेही एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची संधी साेडत नाहीत. अशातच त्यांनी लडाखमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ते दाेघेही सुट्ट्यांचा आनंद घेत एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
लडाखमध्ये मिलिंद सोमण (Milind Soman) याने सुट्टयांचा आनंद घेत, निळ्या आकाशाखाली अंकिता कोनवार (Ankita Konwar) हिला किस करत एक व्हिडिओ पाेस्ट केला आहे. या जाेडप्याने नुकतेच कामापासून विश्रांती घेत लडाखचा प्रवास केला हाेता. व्हिडिओची सुरुवात मिलिंदचे अंकिता जवळ येण्यापासून ते किस घेण्यापर्यंत हाेते. ते दाेघ टरबूजचा आनंद घेताना देखील दिसत आहेत.
View this post on Instagram
मिलिंद अंकिताला चिडवण्यासाठी तिच्या नाकावर किस करताे. त्याने पाेस्टला कॅप्शन देत लिहिले, “सर्वात चमकणारे निळेशार आकाश, सर्वात स्वादिष्ट टरबूज आणि लडाखमधील सर्वात प्रेमळ किस, याहून उत्तम काय असू शकतं? #जीवन #प्रेम #आनंद.”
मिलिंदच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे. एका साेशल मीडिया युजरने लिहिले की, “तुम्ही दाेघे एका कपलच्या भूमिकेत पॉझिटिव्ह वाईब्स देता. देव तुमच्या दाेघांचं भलं करो.” दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले की, “तुमचं प्रेम पाहून मी हरवून गेलो आहे.” आणखी एकाने लिहिले की, “सर्वात सुंदर जाेडी! देव तुम्हाला आशीर्वाद देवो.”
अंकिता कोनवार आणि मिलिंद सोमण यांच्यात 25 वर्षांचं अंतर आहे. ते 2018 साली विवाहबंधनात अडकले होते. या जाेडप्याने खूप कमी लोकांच्या उपस्थित लग्न केले हाेते, ज्यात जवळचे मित्र आणि कुटुंबतील सदस्य हजर हाेते.
दैनिक बाेंवबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ईशा गुप्ताच्या बोल्डनेसचा कहर! फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘दुसरी कीम कार्दशियन…’
शो रद्द होताच कुणाल कामराचे विश्व हिंदू परिषदेला रोखठोक पत्र, पाहा काय आहे प्रकरण
नाचता नाचता हरियाणवी डान्सर उडवू लागली पाणी, डान्स पाहून व्हाल थक्क