शो रद्द होताच कुणाल कामराचे विश्व हिंदू परिषदेला रोखठोक पत्र, पाहा काय आहे प्रकरण

0
50
kunal kamra
Photo Courtesy: Instagram/ Kunalkamra

कॉमेडियन कुणाल कामराचा गुरुग्राममधील शो रद्द करण्यात आला आहे. हा शो 17 सप्टेंबरला होणार होता. ज्याचा विश्व हिंदू परिषदेने निषेध केला होता. आता या प्रकरणी कुणाल कामरा यांनी विश्व हिंदू परिषदेला (विहिप) पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यानेविश्व हिंदू परिषदेवर निशाणा साधला आहे. यासोबतच विश्व हिंदू परिषदेलाही आव्हान देण्यात आले आहे. हे पत्र त्याने ट्विटरवरही शेअर केले आहे.

या पत्रावर कॉमेडियन कामरा याने विश्व हिंदू परिषदेची खिल्ली उडवली आहे. त्याने लिहिले की, “मी तुमच्या नावापुढे विश्व जगाचे नाव लावले नाही कारण या जगातील हिंदूंनी त्यांच्या धर्माचा ठेका तुम्हाला दिला आहे असे मला वाटत नाही. तुम्ही हे स्वतःहून केले आहे, चला, काही फरक पडत नाही. जेव्हा गुरुग्राममध्ये शो रद्द झाला तेव्हा कामराने लिहिले की, “क्लबच्या मालकाला धमकावून तुम्ही माझा गुडगावमधील शो रद्द केला. मी त्या गरीबाला काय दोष देऊ, त्याला व्यवसाय करावा लागेल, तो गुंडांशी कसा सामना करणार? तुम्ही पोलिसांकडे गेलात तरी पोलिस तुमच्याकडे विनंती करायला येतील. एकंदरीत आता यंत्रणा तुमची आहे.”

तत्पूर्वी, शुक्रवारी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने प्रशासनाला निवेदन सादर करून शो रद्द करण्याची मागणी केली. कॉमेडियनच्या शोला परवानगी देऊ नये आणि त्याचा शो रद्द करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. कारण कॉमेडियन त्यांच्या शोमध्ये हिंदू देवांची खिल्ली उडवतात. 17 सप्टेंबरला सेक्टर 29 मध्ये हा शो होणार असेल तर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या कुणाल कामराची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – सलमानची रेकी करणारा अटकेत; पत्राद्वारे दिली होती जीवे मारण्याची धमकी
‘तारे जमीन पर’मधील अभिनेत्रीने शेअर केला एकदम बोल्ड फोटो, 48व्या वर्षी करतेय चाहत्यांना घायाळ
मुनव्वर फारुखीसोबतच्या प्रेमप्रकरणावर अंजलीचा पहिल्यांदाच मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्याला माझ्यात काहीच…’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here