असे म्हणतात की, जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या सर्व गोष्टी अदृश्य होऊन जातात. पैसा, धर्म, वय या गोष्टींच्या नाही, तर आपण फक्त प्रेम या भावनेच्या आहारी वाहवत जातो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. अनेकांनी आपल्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी मोठ्या असणाऱ्या कलाकारांसोबत लग्न केले आहे. आता आपण बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या कलाकारांसोबत लग्न केले आहे.
सैफ अली खान- करीना कपूर
बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक कपलमध्ये सैफ अली खान आणि करीना कपूरचे नाव येते. करीना ही सैफ अली खानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत आनंदात आहे. त्या दोघांना 2 मुले आहेत. त्यांची ओळख ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि तिथूनच त्या दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली.
आमिर खान- किरण राव
बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. किरण ही आमिरपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांची भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. किरण या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका होती. इथूनच त्यांची ओळख झाली. ते खूप दिवस एकमेकांना डेट करत होते. आमिर आणि किरणला एक मुलगा आहे. त्याचे नाव आझाद राव खान हे आहे.
https://www.instagram.com/p/BxfEA6NB6g3/?utm_source=ig_web_copy_link
दिलीप कुमार- सायरा बानो
लग्नात जोडप्यातील वयाच्या अंतराबद्दल बोलायचे झाल्यास, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यातील वयाचे अंतर सर्वात जास्त आहे. दिलीप कुमार हे सायरांपेक्षा 22 वर्षांनी मोठे आहेत. सायरा 22 वर्षांच्या असताना त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले होते. त्यावेळी त्या प्रेमात एवढ्या वेड्या झाल्या होत्या की, त्यांना या सगळ्या गोष्टी अदृश्य वाटत होत्या. त्या 12 वर्षांच्या होत्या, तेव्हापासूनच त्यांच्यावर प्रेम करत होत्या. दिलीप कुमार यांना त्यांच्या वयातील अंतराबाबत पूर्ण कल्पना होती. पण सायरा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या, ही गोष्टही तितकीच खरी होती. त्यामुळे 1966 साली त्या दोघांनी कोणालाही न सांगता लग्न केले होते.
धर्मेंद्र- हेमा मालिनी
आपल्या कलाकारीने सर्वांना वेड लावणाऱ्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीचाही या यादीत समावेश होतो. ‘शोले’ या चित्रपटात दोघांची भेट झाली. हेमा मालिनी ही धर्मेंद्रपेक्षा 13 वर्षांनी लहान आहे. धर्मेंद्र यांचं लग्न झालं आहे ही गोष्ट माहीत असूनही ती त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असत.
त्यानंतर अनेक संकटे पार करून त्या दोघांचं लग्न झालं.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-