सनी लिओनी हे आता एक असे नाव आहे, ज्या नावासाठी कोणत्याच ओळखीची गरज नाहीये. पण ती ओळख आता खूपच बदलली आहे. एके काळी टॉप ऍडल्ट स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिचा हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नव्हता. अश्लीलता या व्यवसायातून निघून बॉलिवूड पर्यंतचा प्रवास करण्यासाठी तिला अनेक संकटाना सामोरे जावे लागले.
या सगळ्यामध्ये सनीची सर्वात जास्त काळजी कोणाला असेल, तर ती तिच्या आई वडिलांना. तिला नेहमीच ही गोष्ट खूप त्रास देते की, तिच्यामुळे तिच्या आई- वडिलांना अनेक मानसिक तणावाला सामोरे जायला लागले होते. तिचे आई वडील खूप वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये राहत होते. सनीचा जन्म सन 1981 मध्ये कॅनडा येथे झाला होता. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती आपले करिअर करण्यासाठी मॉडेलिंग क्षेत्रात गेली. तिचे असे म्हणणे होते की, तिची उंची कमी असल्या कारणाने तिला काम मिळत नव्हते.
सनीचे असे म्हणणे होते की, तिला पैसे कमवून तिच्या कुटंबाला सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत. कमी कालावधीत पैसा कमावण्यासाठी तिने ऍडल्ट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. यामध्ये ती एवढी लोकप्रिय झाली की, 2012 मध्ये मैक्सीम पत्रिकाने तिला मुख्य 12 पॉर्न स्टारमध्ये सामील केले. परंतु जेव्हा ही गोष्ट तिच्या आई-वडिलांना समजली, तेव्हा त्यांना खूपच वेगळे वाटले होते. तिने या गोष्टीचा खुलासा स्वत: च्या तोंडून केला होता. कारण तिला नव्हते वाटत होते की, ही गोष्ट बाहेरून इतर कोणाकडून कळावी. आता जेव्हा तिचे आई- वडील या जगात नाही राहिले, तेव्हा मात्र तिच्या मनात ती वेदना नेहमीच सलत आहे आणि तिला तिच्या आई- वडिलांची खूप आठवण येत आहे.
करणजीत कौर वोहरा उर्फ सनी लिओनी ही इंडो- कॅनेडियन, अमेरिकन अभिनेत्री सोबतच पूर्व पॉर्न चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आहे. पंजाबी कुटुंबातून आलेली अभिनेत्री सनी लिओनी ही पहिली पॉर्न स्टार आहे. जी एका रियॅलिटी शोचा भाग होती. ती बिग बॉस 5 मध्ये देखील स्पर्धक होती. जेव्हा या शोचा टीआरपी कमी झाला होता, तेव्हा सनीने येऊन चांगलाच तडका लावला होता.
तिला हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याआधी अनेक विरोधकांचा सामना करावा लागला होता. तिच्या बॅकग्राउंडला मान्य करायला अनेकांनी विरोध केला होता. यामुळेच अनेक दिग्दर्शक आणि निर्माते तिला काम देण्यासाठी मागे फिरत असत. भारतात तिने पूजा भट्टने दिग्दर्शित केलेल्या ‘जिस्म 2’ या चित्रपटात काम केले. तिथूनच तिच्या अभिनयाला मान्यता मिळाली. त्यांनतर तिने अनेक प्रोजेक्टमध्ये काम केले. अशा प्रकारे तिने एक ऍडल्ट स्टार ते बॉलिवूड अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास केला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अगं बाई!! ‘या’ अभिनेत्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलीय स्त्रीची भूमिका; ‘भाईजान’चाही समावेश










