Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड ‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान

‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान

गेल्याकाही दिवसांमध्ये साऊथ इंडियन चित्रपटांनी बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. साऊथचे चित्रपट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीत उतरत आहेत. ‘दृश्यम-2’, ‘पुष्पा’, ‘मास्टर’, ‘विक्रम’, ‘आरआरआर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी गेल्या काही दिवसात भारतातच नाही, तर जगभरातील भारतीय सिनेचाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. केवळ साऊथचे सेलिब्रिटीच नाहीत, तर आता बॉलिवूड स्टार्सही हे चित्रपट यशस्वी आणि चांगले असल्याचा दावा करू लागले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड अभिनेते महेश मांजरेकर यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी केजीएफ (KGF) आणि कन्नड सिनेसृष्टीचे (Kannada Film Industry) कौतुक केले आहे. तसेच, त्यांनी मराठी चित्रपटांना पुढे नेण्याबद्दल भाष्य केले आहे. 14 सप्टेंबरला परितोष पेंटरचा कॅलिडोस्कोप सिनेमा आणि राजेश मोहंती यांच्या एसआर एंटरप्राईझने मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांच्या बॅनरखाली 7 मराठी चित्रपटांची घोषणा केली. या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनीही सहभाग घेतला होता, ज्यात महेश मांजरेकर देखील उपस्थित होते.

महेश यांनी मराठी चित्रपटांचे काैतुक केले. मात्र, त्यावेळी ते असेही म्हणाले की, मराठी चित्रपटांमध्ये कन्नड चित्रपटांसारखे जीव ओतून काम करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी कन्नड सिनेसृष्टीची अवस्था इतकी वाईट हाेती की, ते कधीही बंद हाेऊ शकत हाेते. मात्र, एक व्यक्ती असा हाेता, जाे चित्रपट बनवण्यावर आणि त्यावर पैसा खर्च करण्यावर विश्वास ठेवत हाेते. त्या व्यक्तीने ‘केजीएफ’ बनवला आणि त्याच्या या पुढाकाराने इतिहास रचला. मला सगळ्यात जास्त आंनद या गाेष्टीचा आहे की, त्यांनी केजीएफचे दाेन्ही भाग हिंदीमध्ये बनवले नाहीत, तर, कन्नडमध्ये बनवून हिंदीमध्ये डब केले.”

महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, त्यांना ‘केजीएफ’ चित्रपटांच्या निर्मात्यांचा हेवा वाटताे. कारण, ते देखील मराठी चित्रपटात असंच काही करण्याची इच्छा बाळगतात. ते म्हणाले, “आम्ही हे ओरडून- ओरडून सांगू शकताे की, मराठी सिनेमा ग्रेट आहे. त्यात टॅलेंटची कमतरता नाही. कमतरता आहे, तर फक्त अशा लाेंकाची, जे मराठी चित्रपटांची दूरदृष्टी समजू शकतील. हे गरजेचे आहे की, आम्ही देखील माेठ्या बजेटची चित्रपट बनवले पाहिजेत. सध्याच्या काळात केवळ मराठी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतच चांगला कंटेंट बनवला जात आहे. कुणी मराठी चित्रपट निर्मात्यावरही विश्वास ठेवून तितका पैसा लावायला हवा, जितका केजीएफच्या निर्मात्यांनी त्या चित्रपटांवर लावला.”

महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. तसेच, त्यांनी ‘वास्तव’, ‘नटसम्राट’ अशा सिनेमांची निर्मितीही केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लहाणपणी सलवारमध्ये अशी दिसायची सारा, आत्याने शेअर केलेला फोटो पाहून बसणार नाही विश्वास…
चाहत्याने गुलाबाचे फूल देताच आर्यनने केले असे काही, चाहत्यांना दिसली शाहरुखची झलक
ऍडमिट होऊन 35 दिवस उलटले, तरीही राजू बेशुद्धच! भाऊ म्हणाला, ‘आता फक्त…’

हे देखील वाचा