Friday, March 29, 2024

“केजीएफ चित्रपट तुम्हाला कसा पाहू वाटला?” महेश मांजरेकर यांचा मराठी प्रेक्षकांना सवाल

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे मराठी तसेच हिंदी सिने जगतातील लोकप्रिय दिग्दर्शक अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा दे धक्का चित्रपट प्रचंड गाजला होता. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव अशा दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात अभिनय साकारला होता. आता १४ वर्षानंतर पुन्हा एकदा दे धक्का चित्रपटाचा रिमेक ‘दे धक्का २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना महेश मांजरेकर यांनी दाक्षिणात्य चित्रपटांवर निशाणा साधला आहे. 

महेश मांजरेकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी सिनेजगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लवकरच त्यांनी दिग्दर्शित केलेला दे धक्का २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “प्रेक्षकांनी सिनेमागृहात हे चित्रपट पाहायला येण्याचे कारण म्हणजे मल्याळम चित्रपटानंतर मराठी चित्रपट सर्वात जास्त मनोरंजन करतात. परंतु मल्याळम चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद आपल्या मराठी चित्रपटांना मिळत नाही.  याचे कारण म्हणजे प्रेक्षक वाढले की त्याचे विभाजन होते. मराठी चित्रपटाला ओटीटीवर हिट मिळत नाहीत.”

केजीएफ चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “केजीएफला एवढा प्रतिसाद का मिळाला हे मला अजुनही कळालेलं नाही. त्यातील दहा टक्के प्रेक्षक जरी मराठी चित्रपटांना मिळाला तरी मराठी चित्रपट चांगले चालतील. युवकांना तो चित्रपट आवडला. पण मग आपल्या चित्रपटात देखील त्याच गोष्टी असतील तरी त्या का आवडत नाही,” असा प्रश्नही त्यांनी यावेळी मराठी प्रेक्षकांना विचारला.

दरम्यान या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी या मुलाखतीत “मी असे म्हणत नाही की हिंदी सिनेमे पाहू नका पण चांगले मराठी चित्रपट नक्की पाहा,” असा सल्लाही त्यांनी प्रेक्षकांना दिला आहे.

हेही वाचा –

आई बनल्यानंतर ‘अशी’ झालीये सलमानच्या अभिनेत्रीची तब्येत, जुना फिगर मिळवण्यासाठी जिममध्ये गाळतेय घाम

‘चल निघं इथून…’ अभिनेता संतोष जुवेकरचा शाहरुखच्या कंपनीत ‘असा’ झाला होता अपमान

खालून लहान अन् वरून ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिशाने घेतली जोखीम, चाहत्यांच्या गर्दीत खाली बसून घेतला सेल्फी

हे देखील वाचा