कलाविश्वात आपण पाहतो की, एखादा अभिनेता एखाद्या अभिनेत्रीचा क्रश असतो. तसेच, अभिनेत्रीही अभिनेत्याच्या क्रश असतात. मात्र, जर असं सांगितलं की, एक अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची क्रश आहे, तर थोडं विचित्र वाटेल. असे असले, तरीही हे खरंय. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा क्रश एक अभिनेता नाही, तर अभिनेत्री आहे. कोण आहे ती, याबद्दल तिने स्वत:च खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊया…
अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) ही नुकतीच तिच्या ‘महाराणी 2’ या वेबसीरिजच्या स्टार कास्टसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) पोहोचली होती. यावेळी तिने होस्ट कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि अर्चना पूरन सिंग (Archana Pooran Singh) यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी तिने सांगितले की, तिला बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) खूप आवडते. यावेळी तिने माधुरीबद्दलच्या अनेक गोष्टीही शेअर केल्या.
‘डेढ इश्किया’मध्ये केले होते एकत्र काम
अभिनेत्री हुमा कुरेशी आणि माधुरी दीक्षित (Huma Qureshi And Madhuri Dixit) यांनी ‘डेढ इश्किया’ या सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमाशी निगडीत आठवणींना उजाळा देत हुमाने सांगितले की, कशाप्रकारे ती माधुरीला पाहून हैराण व्हायची. हुमा म्हणाली की, “मी त्यांना परफॉर्म करताना पाहायचे. त्यांच्यावरून नजर हटवणे माझ्यासाठी कठीण व्हायचे. मला वाटते की, प्रत्येक मुलगी त्यांच्याकडे असेच पाहत असेल. जेव्हा मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी चिंताग्रस्त आणि उत्साही दोन्हीही होते.”
View this post on Instagram
‘मातीशी जोडलेल्या आहेत माधुरी’
एक व्यक्ती म्हणून माधुरीबद्दल बोलताना हुमाने सांगितले की, ती किती ‘मातीशी जोडलेली’ आहे. अभिनेत्री म्हणाली की, त्या एक सुपरस्टार असूनही सेटवरील माहोल एकदम आरामदायी बनवायच्या. तसेच, तिच्याशी आपले कुटुंब आणि मुलाबाळांबद्दल चर्चा करायची. हुमाने सांगितले की, “त्या खूप गोड व्यक्ती आहेत. त्या माहोल एकदम आरामदायी बनवत होत्या. त्या माझ्याशी घर आणि आपल्या मुलांबद्दल एकदम सामान्य मुलीप्रमाणे आणि सामान्य गृहिणीसारख्या बोलायच्या.”
Aaj raat 9:30 baje, Sony par #TheKapilSharmaShow mein Ustaad Ji ki lajawaab comedy ne diye jalaaye aur sabhi ko hasaaya!✨???? pic.twitter.com/cMzRCOOEbi
— sonytv (@SonyTV) September 18, 2022
हुमाने माधुरीबद्दल जे काही सांगितले, त्यावरून समजते की, माधुरी हुमाची किती आवडती अभिनेत्री आहे. कदाचित हुमाच्या या वक्तव्यानंतर माधुरी अनेक तरुणींची क्रश बनली असावी.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छीsss!’ पारंपारिक पोशाखात अभिनेत्रीने ओढली सिगारेट, हातात दारूचा ग्लास बघताच संतापले चाहते
अनुष्काने पतीच्या आठवणीत लिहिली भावूक पोस्ट, विराटनेही दिला असा रिप्लाय की, सर्वत्र रंगली एकच चर्चा
‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप