Tuesday, April 21, 2026
Home बॉलीवूड ‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप

‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप

चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे एमएमएस लीक प्रकरण सध्या चर्चेत आहे. या घटनेपासून आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे, त्यापैकी फक्त एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदीगड विद्यापीठ प्रकरणाच्या नावाने अनेक बनावट व्हिडिओही पाठवले जात आहेत. दरम्यान, या घटनेबाबत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) प्रतिक्रिया समोर आली आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून त्यांनी या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे.

चंदीगडमधील घटनेबाबत सोनू सूदने लिहिले “चंदीगड विद्यापीठात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचा आदर्श ठेवण्याची वेळ आली आहे. ही वेळ आपल्या सर्वांसाठी आहे, पीडितांसाठी नाही. जबाबदार राहा.” चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनींनी काल रात्री निदर्शने केली होती.

आंदोलक विद्यार्थिनींनी या घटनेशी संबंधित लोकांचे प्राण गमावले आणि जखमी झाल्याचा आरोपही केला. दरम्यान, पंजाब सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी असल्याचेही बोलले जात आहे.एसएसपी विवेकशील सोनी सांगतात की, एका विद्यार्थ्याने व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो व्हायरल केला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणात चंदीगड विद्यापीठाचे वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचा कोणताही व्हिडिओ आक्षेपार्ह आढळला नाही, एका मुलीने शूट केलेला खाजगी व्हिडिओ वगळता जो तिच्या प्रियकरासह शेअर केला होता. 7 मुलींनी आत्महत्या केल्याची अफवा पसरली असली तरी एकाही मुलीने असे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला नाही हे सत्य आहे. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही वाचा – बोल्ड अँड ब्युटीफूल! जान्हवीचे लेटेस्ट फोटो तुम्हालाही करतील घायाळ
अनिल कपूर यांना यामुळे वाटायची जॅकी श्रॉफची भीती, स्वतः केला खुलासा
सोनाली कुलकर्णी स्टाईल एकदम भारी! एकदा फोटो पाहाच

हे देखील वाचा