Sunday, August 3, 2025
Home टेलिव्हिजन आश्चर्यचं! मलायका, अरबाज आणि अर्जुन कपूर दिसणार एकाच कार्यक्रमात, कधी आणि कुठे घ्या जाणून

आश्चर्यचं! मलायका, अरबाज आणि अर्जुन कपूर दिसणार एकाच कार्यक्रमात, कधी आणि कुठे घ्या जाणून

बॉलीवूडमधील स्टायलिस्ट अभिनेत्रींपैकी एक असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. ताज्या अपडेटनुसार, मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा ‘अरोरा सिस्टर्स’ नावाचा वेब शो घेऊन येणार आहेत. हा शो खूप मसालेदार असणार आहे आणि त्यात अनेक मसालेदार गोष्टी पाहायला मिळणार आहेत. अलीकडेच, मलायका अरोराचा माजी पती अरबाज खान (Arbaaj Khan) आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या शोबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे.

हा शो अरोरा सिस्टर्स होस्ट करणार आहेत. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर येणार आहे. अरबाज खान आणि अर्जुन कपूर देखील या शोचा एक भाग असणार असल्याचे बोलले जात आहे, परंतु दोघेही एकत्र नसून वेगळे दिसणार आहेत. या शोमध्ये अरबाज व्यतिरिक्त अर्जुन, अमृता आणि मलायकाचे फॅमिली मेंबर्स आणि काही मित्रही दिसणार आहेत. हे सर्व ऐकल्यानंतर अमृता आणि मलायकाचे चाहतेही चांगलेच उत्साहित झाले आहेत.

हा शो मलायका आणि अमृताच्या आयुष्याभोवती फिरणार आहे. दोन्ही बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा चर्चेत असतात, त्यामुळे या शोमध्ये चाहत्यांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल. अमृता आणि मलायका यांचे इंडस्ट्रीत खूप मित्र आहेत. अशा परिस्थितीत करीना कपूर आणि करिश्मा कपूर देखील या शोमध्ये प्रवेश करू शकतात.

मलायकाचा अरबाज खानपासून २०१६ साली घटस्फोट झाला होता. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे. अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की मलायका आणि अर्जुन लग्न करणार आहेत, मात्र अद्याप या बातमीवर कोणतेही नवीन अपडेट आलेले नाही.

हेही वाचा- पंतप्रधानांनी देशात आणले चित्ते; सोशल मीडियावर मिम्सचा महापूर, पाहून तुम्हालाही येईल हसू
परी म्हणू की सुंदरा! जान्हवीच्या फोटोंची बातचं न्यारी
सई ताम्हणकरचा नुकताच बोल्ड लुक होतोय व्हायरल, एकदा पहाच

हे देखील वाचा