रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. वर्ल्डवाइड चित्रपटाने 350 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रचंड बजेटचीही खूप चर्चा आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकतेच चित्रपटाचे बजेट आणि रणबीर कपूरच्या फीबद्दल मोठा खुलासा केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रम्हास्त्र चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे जोरदार कौतुक होताना दिसत आहे. मात्र अयान मुखर्जी यांनी रणबीप कपूरच्या मानधनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान अयान मुखर्जीने खुलासा केला की रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्त्र’साठी कोणतेही शुल्क घेतलेले नाही.
त्यांनी सांगितले की “हा चित्रपट आमच्या जिद्द आणि त्यागातून तयार झाला आहे. स्टार अभिनेता म्हणून रणबीरने या चित्रपटासाठी किंमत घेतली नाही हे खरे आहे. ब्रह्मास्त्रसाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतलेले नाही. मला विश्वास आहे की याशिवाय आपण हा चित्रपट बनवू शकलो नसतो. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा चित्रपट बनवता आला नसता. इतर लोकांनीही असेच केले आहे की नाही हे मला माहीत नाही.”
‘ब्रह्मास्त्र’ची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाने 360 कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपटाचा पहिला वीकेंड छान गेला. पहिल्या तीन दिवसांत हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिवशी चित्रपटाचे तिकीट चित्रपटगृहांमध्ये अवघ्या 75 रुपयांना मिळणार आहे, ज्याबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा- काळीज तोडणारी बातमी! 24 वर्षीय अभिनेत्याने आईचीच केली हत्या, कोर्टाने पाठवलं 14 वर्षे खडी फोडायला
अशोक सराफांनी चुकून बोललेला ‘तो’ डायलॉग झाला अजरामर, ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचा कधीही न ऐकलेला किस्सा
हॉटेलमध्ये जेवायला गेला अन् प्रेमात पडला, अभिनेता बॉबी देओलची फिल्मी लवस्टोरी ऐकून व्हाल थक्क